दिशा सालियान प्रकरणाचा तपास बंद होण्याची शक्यता, भाजप आमदार नितेश राणेंचे राज्य सरकारला गंभीर सवाल

सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना काही गंभीर प्रश्न विचारले आहेत.

दिशा सालियान प्रकरणाचा तपास बंद होण्याची शक्यता, भाजप आमदार नितेश राणेंचे राज्य सरकारला गंभीर सवाल
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 10:51 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या आत्महत्येची चौकशी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राज्य सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईतील मालवणी पोलिसांनी दिशा सालियान प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरच बंद केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. ( BJP MLA Nitesh Rane questions to government on Disha Salian case)

दिशा सालियान प्रकरणाचा तपास पोलिसांना कुठलेही पुरावे न मिळाल्यानं बंद केला जाणार आहे का? मग तपास अधिकारी दोन वेळा का बदलण्यात आला? रोहन राय अद्यापही का फरार आहे ? त्या रात्रीपासून तिच्या बिल्डिंगचा पहारेकरी का गायब आहे? तिचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप का बाहेर आला नाही? असे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विचारले आहेत.

त्याचबरोबर ‘त्या रात्रीचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात आलं का? कुठल्याही प्रकारचा तपास न करता पोलिस या प्रकरणाचा तपास का बंद करत आहेत? याबाबत काहीतरी शंकास्पद घडत आहे आणि त्यावर आम्ही बारिक लक्ष ठेऊन आहोत. या प्रकरणात पुढे काही पुरावे समोर आल्यास पोलिसांची नाचक्की होऊ नये,’असंही ट्वीट राणे यांनी केलं आहे.

फॉरेन्सिक विभागातील एकाने मला काही कागद दाखवले. ज्यात ही आत्महत्या नसल्याचं स्पष्ट होतं. मग या प्रकरणाचा तपास बंद करण्याची घाई पोलिस का करत आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.

काय आहे प्रकरण?

सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट एसपी दिलीप यादव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे आत्महत्या प्रकरणाची चौकशी बंद केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही

सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृतदेहावर कपडे नव्हते, पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता

BJP MLA Nitesh Rane questions to government on Disha Salian case

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.