शिक्षिकेवर पतीचा कुऱ्हाडीने वार, स्टाफरुममध्ये थरार

जिल्ह्यातील इर्री टोला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची तिच्या पतीने कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा डोंगरे असे या शिक्षिकेचे नाव आहे.

शिक्षिकेवर पतीचा कुऱ्हाडीने वार, स्टाफरुममध्ये थरार

गोंदिया : जिल्ह्यातील इर्री टोला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची तिच्या पतीने कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा डोंगरे असे या शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे.

शिक्षिका प्रतित्रा डोंगरे शाळेत असताना त्यांचा पती दिलीप डोंगरे शाळेत आला. यावेळी प्रतिभा आणि त्यांच्या पतीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे सुरु असतानाच आरोपी दिलीप डोंगरेने शाळेतच प्रतिभा यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यातच प्रतिभा यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी दिलीप डोंगरे पसार झाला आहे. विशेष म्हणजे शिक्षिकेवर कुऱ्हाडीने वार होत असताना बाजूच्या वर्गात विद्यार्थी देखील उपस्थित होती. हत्येनंतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत पंचनामा केला आहे. तसेच आरोपीचा शोधही सुरु केला. अद्याप या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस याचा तपास करत आहेत.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI