‘मिहान’ प्रकल्पातून तब्बल 54 हजार नोकऱ्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आश्वासनपूर्ती

गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'मल्टी-मॉ इंटरनॅशनल कार्गो हब अॅन्ड एअरपोर्ट अॅट नागपूर' अर्थात मिहानमधून तब्बल 54 हजार रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. नागपूर आणि विदर्भाच्या विकासासह स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे.

'मिहान' प्रकल्पातून तब्बल 54 हजार नोकऱ्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आश्वासनपूर्ती
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:22 AM

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या नागपुरात एक असं मॉडेल तयार केलं आहे, ज्यात 54 हजाराहून अधिक लोकांना नोकरी मिळाली आहे. गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मल्टी-मॉ इंटरनॅशनल कार्गो हब अॅन्ड एअरपोर्ट अॅट नागपूर’ अर्थात मिहान प्रकल्पातून ही संधी निर्माण झाली आहे. नागपूर आणि विदर्भाच्या विकासासह स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे. त्यामुळे 2014च्या निवडणुकीत गडकरींनी जनतेला दिलेलं आश्वासनही पूर्ण करुन दाखवलं आहे.(54,000 jobs from Nitin Gadkari’s Mihan project)

भौगोलिक स्थितीमुळे वायू आणि रेल्वे वाहतूकीला महत्व

आपल्या भौगोलिक स्थितीमुळे नागपूर हे वायू आणि रेल्वे वाहतुकीसाठी महत्वपूर्ण शहर आहे. अशास्थितीत नितीन गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भाला आर्थिक केंद्र बनवण्यासाठी ‘मल्टी-मॉ इंटरनॅशनल कार्गो हब अॅन्ड एअरपोर्ट अॅट नागपूर’ या प्रकल्पाची सुरु केली. 2009 पासूनच गडकरी या प्रकल्पाच्या कामाला लागले होते.

‘गडकरी यांनी नागपुरात विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात ‘सेज’ची स्थापना केली. त्यावेळी काही कंपन्यांनी मिहानमध्ये गुंतवणूकही केली. पण आघाडी सरकारच्या काळात काही कंपन्यांनी मिहानमधून काढता पाय घेतला. पुढे 2014 मध्ये गडकरींनी 50 हजार नौकऱ्या देणाचं आश्वासन दिलं. 2014 ची लोकसभा निवडणूक गडकरींनी जिंकली आणि ते मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाले. त्यानंतर गडकरींनी आपला महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहान पुन्हा उभारी देण्यावर लक्ष केंद्रीय केलं. त्यावेळी अनेक मोठ्या कंपन्यांनी मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली.

एअर इंडियासह अनेक कंपन्यांकडून हजारो नोकऱ्या

एअर इंडियाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात नागपुरात 4 हजार 500 नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या. तर HCL अडीच हजार आणि टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेसने (TCS) 7 हजार 500 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला. याप्रमाणे 170 पेक्षा अधिक कंपन्यांनी मिहानमध्ये गुंतवणूक करुन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून IANSला सर्व कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली आहे. त्यानुसार मागील 6 वर्षात नागपुरात 54 हजार 868 जणांना नोकरी मिळाली आहे. नागपुरात उद्योगांची स्थापना आणि विकासाच्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेजद्वारे 36 हजार 407, तर नॉन सेजद्वारे 16 हजार 162 रोजगार मिळाले आहेत. तसंच सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग मिहान सेजच्या माध्यमातून 2 हजार 299 नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. नागपूरकरांना यापुढेही रोजगाराच्या अनेक संधी मिळणार आहेत.

संंबंधित बातम्या:

कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते : नितीन गडकरी

‘नागपूर मनपाची सर्व वाहनं 6 महिन्यात CNG करा’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूर महापालिकेला सूचना

54,000 jobs from Nitin Gadkari’s Mihan project

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.