नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत, डबल डेकर पूल असणारा देशातला पहिला प्रकल्प

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. मेट्रो आता नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाली असून खापरी ते बर्डी असा 13 किमीचा प्रवास सुरु झाला. नागपूर मेट्रो देशातील सर्वात जलद गतीने प्रवाशांच्या सेवेत आलेली मेट्रो आहे. […]

नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत, डबल डेकर पूल असणारा देशातला पहिला प्रकल्प
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. मेट्रो आता नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाली असून खापरी ते बर्डी असा 13 किमीचा प्रवास सुरु झाला.

नागपूर मेट्रो देशातील सर्वात जलद गतीने प्रवाशांच्या सेवेत आलेली मेट्रो आहे. मेट्रोच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्थेला पर्याय मिळाला आहे. नागपूरची मेट्रो म्हणजे 21 व्या शतकाची खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. प्रत्येक शहरात ट्रान्सपोर्ट व्यवस्था ही महत्त्वाची असते. मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या सुद्धा निर्माण होते. त्यामुळे मेट्रो ही एक चांगली व्यवस्था असून शहराच्या विकासात चार चाँद लावणारी असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

नागपूर मेट्रो ही देशातील ग्रीन मेट्रो आहे. या मेट्रोसाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. स्टेशन सुद्धा ग्रीन आणि ऐतिहासिक आहेत. कमी खर्च आणि कमी वेळात बनलेली ही मेट्रो आहे. नागपुरात वर मेट्रो आणि खाली उड्डाण पूल, त्या खाली रोड अशी व्यवस्था असलेली देशातील कदाचित पहिलीच सेवा  असावी, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

देशात मेट्रोचं जाळ तयार होत आहे. त्यात नागपूरची मेट्रो हे एक उदाहरण असून ग्रीन मेट्रो आहे. ज्या प्रमाणे नागपूरची संत्री जगात प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मेट्रो सुद्धा जगप्रसिद्ध होईल आणि दुसऱ्या फेजच्या उद्घाटनाला आपण नागपुरात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नागपूरची मेट्रो आता खऱ्या अर्थाने सेवेत रुजू झाली असून नागपूरकर त्याचा आनंद शुक्रवारपासून घेऊ शकणार आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें