नागपूर मनपाच्या मालमत्ता कराची 572 कोटींची थकबाकी, मनपा आर्थिक संकटात

कर थकल्याने नागपूर मनपा आर्थिक संकटात सापडली आहे. नागपुरातील विकास कामांवरही याचा विपरित परिणाम झाला आहे.

नागपूर मनपाच्या मालमत्ता कराची 572 कोटींची थकबाकी, मनपा आर्थिक संकटात

नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) मालमत्ता कराची 572 कोटींची अद्याप थकबाकी आहे (Property Tax  Outstanding Of 572 Crore Rs.). कर थकल्याने नागपूर मनपा आर्थिक संकटात सापडली आहे. नागपुरातील विकास कामांवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कराची सक्तीने वसुली करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. पण गेल्या काही वर्षांत नागपूर महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे 572 कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी वाढत गेल्याले नागपूर शहरातील विविध विकास कामांवर परिणाम झाला. नागपुरात एकीकडे काही लोक प्रामाणिकपणे मनपाचा मालमत्ता कर भरत आहेत. तर काही थकबाकीदारांकडे वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत आहे.

नागपूर मनपाच्या मालमत्ता कराचे शहरात 1 लाख 92 हजारपेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांकडे तब्बल 572 कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या काही वर्षांत मालमत्ता करवसुलीसाठी मनपाचे प्रयत्न सुरु आहेत. पण कोव्हिडमुळे आठ महिन्यांपासून कर वसुलीवर परिणाम झाला आहे.

आता स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी सक्तीने मालमत्ता करवसुलीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ज्यांच्याकडे अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहेत, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव सुद्धा करण्यात येणार आहे.

Property Tax  Outstanding Of 572 Crore Rs.

संबंधित बातम्या :

‘भाजपचा अभिमान तोडायचा आहे’, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल

नागपूर पदवीधर मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : भाजप बालेकिल्ला राखणार, की काँग्रेस गड खेचून आणणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI