ओम साई! दहा रुपयाचा चहा प्यायला गेला, तीन हजाराची पावती फाडली!

आषाढधारांमुळे 'सादळ' झालेल्या एका युवकाला चहा घ्यावासा वाटला. त्यासाठी तो एका चहाच्या नवीनच उघडलेल्या दुकानात शिरला.

ओम साई! दहा रुपयाचा चहा प्यायला गेला, तीन हजाराची पावती फाडली!
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 4:47 PM

नांदेड : सध्या आषाढधारांमुळे बहुतांश महाराष्ट्र ओलाचिंब झाला आहे. नांदेडमध्येही रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाच्या या वातावरणात ताजतवाना होण्यासाठी हमखास घ्यावेसे वाटणारे पेय म्हणजे वाफाळलेला चहा…! अमृततुल्य असं चहाला संबोधणाऱ्या एका कंपनीने चहाचे 1 दुकान नांदेडमध्ये नुकतंच सुरू झालं आहे. त्याच दुकानावर चहा घेण्यासाठी गेलेल्या युवकाला एक चहा तीन हजार दहा रुपयांना पडला.

त्याचं झालं असं की आषाढधारांमुळे ‘सादळ’ झालेल्या एका युवकाला चहा घ्यावासा वाटला. त्यासाठी तो एका चहाच्या नवीनच उघडलेल्या दुकानात शिरला. त्याने मस्तपैकी दहा रुपये किंमतीचा गरमागरम चहा घेतला. त्यानंतर हा युवक पुन्हा आपल्या बाईकजवळ आला. त्यावेळी पाहतो तर काय त्याच्या बाईकला वाहतूक पोलिसांनी पकडून ठेवलं होतं.

त्या युवकाने जायचं आहे असं म्हणताच पोलिसांनी त्याच्याकडे वाहन परवाना, गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले. पण या चहा शौकिनाजवळ यातील काहीच नव्हतं. इतकंच काय तर त्याने आपल्या बाईकच्या नंबरवर कलाकारी करून ओमसाई असं लिहिलं होतं. त्यामुळे त्याच्या गाडीच्या नंबरचाही बोध होत नव्हता.

चहा घेण्यासाठी आलेल्या या युवकाने केलेल्या सर्व चुकांसाठी वाहतूक शाखेने दंड लावण्याचं ठरवलं आणि त्याचं एकूण बिल झालं थेट तीन हजार रुपये. युवकाने थोडा विरोध केला पण आपली चूक लक्षात आल्याचे पाहून त्याने वाहतूक शाखेकडे तीन हजार रुपयांचा दंड भरला. हा दंड भरल्यावर चाय से किटली गरम या म्हणीचा त्या युवकाला पुरता अर्थबोध झाला असावा.

तीन हजार दहा रुपयाला पडलेला हा चहा तो युवक कदापी विसरू शकणार नाही. कारण अगदी फाईव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार हॉटेलातही एका चहाची किंमत नक्कीच इतकी नसते. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून, नंबरप्लेट चुकीच्या पद्धतीने लावणे, शिवाय रस्त्यावर गाडी पार्क करणं तुम्हालाही महागात पडू शकतं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.