रुग्णाकडून विनयभंगाचा आरोप, डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

डॉ. गोविंद गारे यांनी आपल्याला 'तू खूप आवडतेस' असं म्हणत विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला होता.

रुग्णाकडून विनयभंगाचा आरोप, डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

नाशिक : महिला रुग्णाने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर व्यथित झालेल्या नाशकातील डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं. डॉक्टर गोविंद गारे यांनी सातमजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Nashik Doctor Suicide) उघडकीस आली आहे.

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ही घटना घडली. तक्रारदार महिला रुग्ण पित्ताचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टर गोविंद गारे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती.

उपचार घेत असताना डॉक्टर गारे यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने सिन्नर पोलिसात दिली होती. डॉ. गोविंद गारे यांनी आपल्याला ‘तू खूप आवडतेस’ असं म्हणत विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला होता. रुग्ण महिलेच्या तक्रारीवरुन सिन्नर पोलिसांनी डॉक्टर गारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासात डॉक्टर गारे यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर पोलीस डॉ गारे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत अधिक तपास (Nashik Doctor Suicide) करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI