Nashik | त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर थेटे यांचे निधन

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर गणेश थेटे यांचे निधन झाले आहे. ते भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते.

Nashik | त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर थेटे यांचे निधन
मुरलीधर थेटे
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:52 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे (Trimbakeshwar) माजी नगराध्यक्ष मुरलीधर गणेश थेटे (Murlidhar Thete) यांचे निधन झाले आहे. ते भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पक्षाचा मोठा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांना सर्वजण अण्णा या नावाने ओळख असत. त्यांनी 1 जानेवारी रोजी वयाची 88 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या मागे दोन विवाहित मुले, सुना, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. मुरलीथर थेटे हे त्र्यंबक नगरपालिकेचे दोन वेळेस नगरसेवक व नगराध्यक्ष राहिले आहेत. जनसंघ ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. थेटे यांचा 1992 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती शंकर दीनदयाल शर्मा यांच्या हस्ते पुण्यात गौरव करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष स्व. यादवराव तुंगार यांचे राजकारणातील निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. त्र्यंबकेश्वरच्या राजकारणात त्यांचे मानाचे स्थान होते. इतरही सामाजिक कार्यात त्यांचा वावर असायचा. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्त्या हरपल्याने भाजपमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजकीय वर्तुळात दबदबा

त्र्यंबकेश्वरच्या राजकीय वर्तुळात त्यांचा शेवटपर्यंत दबदबा कायम होता. गेल्यावर्षी 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यात त्यांना नाशिकमध्ये दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मुरलीधर थेटे यांनी थेटे मंगलकार्यालायाची स्थापना केली. 1985 च्या दरम्यान त्यांनी हे मंगलकार्यालय सुरू केले. गोरगरिबांची लग्ने येथे संपन्न होत असत. त्यांच्या निधनाबद्दल आमदार सीमाताई हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. मुरलीधर थेटे यांच्या शब्दाला त्र्यंबकेश्वरच्या राजकारणात मान होता. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची हानी झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जनसंघ ते भाजप…

– मुरलीधर थेटे यांनी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष भूषविले.

– थेटे दोन वेळेस नगरसेवक राहिले.

– जनसघ ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा प्रवास.

– थेटे यांचा तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते गौरव.

– स्व. यादवराव तुंगार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख.

– राजकारण, समाजकारणात वावर.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.