निफाडमध्ये बर्फ पडायचाच बाकी, पारा 1.8 अंशांवर

निफाडमध्ये बर्फ पडायचाच बाकी, पारा 1.8 अंशांवर

नाशिक: निफाड तालुक्यात थंडीने निचांकी तापमानाची नोंद केली आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर 1.8 अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून गायब झालेली थंडी अचानक वाढल्याने, निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे. जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे किमान तापमान उणे झालं आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे गायब झालेल्या […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:47 PM

नाशिक: निफाड तालुक्यात थंडीने निचांकी तापमानाची नोंद केली आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर 1.8 अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून गायब झालेली थंडी अचानक वाढल्याने, निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे.

जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे किमान तापमान उणे झालं आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे गायब झालेल्या थंडीचे जोरदार आगमन झाल्याने राज्यातील पारा घसरत आहे. या हंगामातील निचांकी तापमानाची अर्थात 1.8 अंश सेल्सिअसची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी इथे झाली.    

10 डिसेंबरपासून थंड वार्‍यांमुळे निफाड तालुका गारठला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात फेब्रुवारी 2012 मध्ये उणे 0.02 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. गेल्या सहा वर्षानंतर आज या थंडीच्या हंगामातील 1.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झाली आहे.

कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. दुसरीकडे या थंडीचा फायदा हरभरा आणि गव्हाच्या पिकाला होणार आहे. थंडीमुळे नुकतीच फुगवन स्टेजला असलेल्या द्राक्षमन्यांना तडे जाण्याच्या भीतीने ठिकठिकाणी द्राक्ष बागात उत्पादकांनी द्राक्ष घडाला पेपर लावले आहेत. मात्र थंडीचा जोर असाच राहिल्यास द्राक्षांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें