कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक, ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांकडून व्हिडीओ ट्विट

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एका नर्सचा व्हायरल व्हिडीओ ट्विट केला आहे. यात ती नर्स कोरोनाची लागण झालेल्या लहान बाळाला हसवताना दिसत (Jayant patil Child Corona Viral Video) आहे.

कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक, 'सलाम या वीरांना' म्हणत जयंत पाटलांकडून व्हिडीओ ट्विट

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Jayant patil Child Corona Viral Video) आहे. कोरोनाच्या विळख्यातून लहान मुलांपासून वयस्कर लोकही यातून सुटलेली नाहीत. कोरोनाच्या या संकटातही स्वत: ला झोकून देऊन पोलीस, वैद्यकीय कर्मचारी असे अनेक लोकांची सेवा करत आहे. सर्वच स्तरावरुन त्यांचे कौतुक होत आहे. नुकतंच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एका नर्सचा व्हायरल व्हिडीओ ट्विट केला आहे. यात ती नर्स कोरोनाची लागण झालेल्या लहान बाळाला हसवताना दिसत आहे.

जयंत पाटील या ट्विट केलेल्या या व्हिडीओत एक लहान बाळ दिसत (Jayant patil Child Corona Viral Video) आहे. तर या व्हिडीओत नर्सने कोरोना रुग्णाला बघायला जातानाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या तोंडाला मास्कही लावण्यात आला आहे. ही नर्स त्या बाळाला त्याचे नाव विचारताना, त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. दीड मिनिटाच्या या व्हिडीओत तिने या चिमुकल्याने त्या नर्ससोबत फार गमतीजमतीही केलेल्या आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातील आहे, त्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे का? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हा व्हायरल व्हिडीओ जयंत पाटील या ट्विट केला आहे. “कोरोनाच्या विळख्यातून लहान मुलांपासून वयस्कर लोकंही सुटलेली नाहीत. या सर्व रुग्णांची जबाबदारी देशातील वैद्यकीय क्षेत्राने आपल्या खांद्यांवर झेलली आहे. तहान-भूक विसरून, घरदार सोडून, न थकता हे रक्षक झटतायत. सकारात्मकता काय असते ते पहाच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत. सलाम या वीरांना!,” असे जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. “कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे काही कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार,” असे पत्रही राजेश टोपे यांनी लिहिले (Jayant patil Child Corona Viral Video) होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI