देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राष्ट्रवादीचा खो

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील (NCP leader Prakash Patil) विरोध केला आहे.

  • Publish Date - 3:44 pm, Mon, 4 January 21
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राष्ट्रवादीचा खो

नवी मुंबई : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाचा राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील (NCP leader Prakash Patil) विरोध केला आहे. स्थानकासमोरील जागेत गृहप्रकल्प झाल्यास स्थानकाचा श्वास कोंडेल. शिवाय भविष्यात पार्किंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवतील अशी भूमिका त्यांनी या प्रकल्पाला विरोध करताना मांडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या गृहप्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. प्रशांत पाटील यांनी आज (4 जानेवारी) प्रस्तावित प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यांनतर त्यांनी ही भूमिका मांडली. (NCP leader Prakash Patil opposes the CIDCO housing project)

पार्किंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवणार

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या भूखंडावर सिडको पंतप्रधान आवास योजना राबवत आहे. येथे अल्प उत्पादन गटातील नागरिकांकरीता घरे बांधली जाणार आहेत. परंतु सध्या या जागेवर बस टर्मिनल, रेल्वे प्रवाशांसाठी वाहनतळाची सोय आहे. येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिडकोतर्फे (CIDCO) घरं बांधण्यात येणार आहेत. सकाळ-संध्याकाळी याठिकाणी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. स्थानकासमोरील जागेत गृहप्रकल्प झाल्यास स्थानकाचा श्वास कोंडेल. शिवाय भविष्यात पार्किंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवतील असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सिडकोच्या या योजनेच्या विरोधात नागरी हक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. सिटीजन युनिटी फोरम, एकता सामाजिक सेवा संस्था या संस्थेसारख्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. या सामाजिक संस्थांकडून सिडकोच्या या प्रकल्पाला वरोध केला जात आहे.

याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकल्पविरोधी आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता. या पक्षांनी खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील गृहप्रकल्पाला विरोध म्हणून आंदोलन केले होते. परंतु आंदोलन करूनसुद्धा सिडकोने प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा नवी मुंबईत होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला विरोध केला आहे. दरम्यान, आगामी काळात सरकार या प्रकल्पावरुन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरवरुन वाद, मनसेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन

(NCP leader Prakash Patil opposes the CIDCO housing project)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI