ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे 'चौकार', मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय
ind vs nz
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 10:58 AM

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघाला भारताने अवघ्या 62 धावांत रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केली. आणि न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवलं नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात 167 धावांमध्ये ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसऱ्या दिवशी भारताने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने काल दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता होती. तर भारताला पाच विकेट्सची गरज होती. मात्र किवी संघ आजच्या दिवसात 27 धावा जोडू शकला. अवघ्या 27 धावांनी त्यांनी उर्वरित 5 फलंदाज गमावले. (ND vs NZ, 2nd Test : India Defeated New Zealand by 372 run in Mumbai test)

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने किवी कर्णधार टॉम लॅथमला (6) स्वस्तात बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (20) आणि रॉस टेलर (6) यांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवत न्यूझलंडला संकटात टाकलं. त्यानंतर डॅरिल मिचेलने फटकेबाजी करत झुंज दिली, मात्र तोदेखील 60 धावा करुन अक्षर पटेलची शिकार ठरला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. 129 धावांत न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स (36) आणि रचिन रवींद्र (2) या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 8 षटकं खेळू काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली.

हेन्री निकोल्स आणि रवींद्र आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांचा फार प्रतीकार करु शकले नाहीत. सकाळच्या सत्रात जयंत यादवने रचिनला पुजाराकरवी झेलबाद केलं. त्यानंतर काईल जेमिसनलादेखील त्याने पायचित करत माघारी धाडलं. पाठोपाठ टिम साऊथीलादेखील जयंतने त्रिफळाचित केलं. दोघेही खातंदेखील उघडू शकले नाहीत. अखेर हेन्री निकोल्स याला रवींचंद्रन अश्विनने बाद केलं. निकोल्स यांनी 44 धावांचं योगदान देत बराच वेळ संघर्ष केला. भारताकडून या डावात रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. तर अक्षर पटेलला एक विकेट घेता आली.

न्यूझीलंड 65 वर्षांपासून मालिका विजयाच्या प्रतीक्षेत

1956 पासून न्यूझीलंडचा हा 12 वा भारत दौरा होता. या दौऱ्यासह, उभय संघांमध्ये भारतात 37 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर 15 कसोटी सामने गमावले आहेत. यावरून न्यूझीलंडचा भारतातील रेकॉर्ड किती वाईट आहे हे स्पष्ट होते. न्यूझीलंडने 1988 मध्ये टीम इंडियाचा अखेरचा पराभव केला होता. न्यूझीलंडने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या 65 वर्षांपासूनची ही न्यूझीलंडविरोधातील विजयांची मालिका यंदादेखील कायम राखण्यात भारतीय संघाला यश आलं आहे.

इतर बातम्या

पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

Thane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार

(ND vs NZ, 2nd Test : India Defeated New Zealand by 372 run in Mumbai test)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.