‘होय, मी डीप्रेशनमध्ये आहे’, ब्रेकअपनंतर नेहा कक्करचा खुलासा

‘होय, मी डीप्रेशनमध्ये आहे’, ब्रेकअपनंतर नेहा कक्करचा खुलासा

मुंबई बॉलीवूडची लोकप्रिय गायिका आणि प्रसिद्ध सिंगिंग रियालिटी शोची जज नेहा कक्करने ती तणावाखाली असल्याची कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा ही तणावग्रस्त असल्याचं दिसून येत आहे. तिच्या या परिस्थितीचे कारण तिचं आणि अभिनेता हिमांश कोहलीचं ब्रकअप असल्याचं सांगितलं जात आहे. याबबात आता नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकत ती तणावाखाली असल्याची कबुली दिली आहे.

नेहाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जगातील नकारात्मक लोकांमुळे आपण तणावग्रस्त असल्याचं सांगितलं आहे. तिने लिहीले की, ‘हो मी तणावाखाली आहे. यासाठी जगातील सर्व नकारात्मक लोकांचे धन्यवाद. मला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस दाखवण्यात तुम्ही यशस्वी झालात. शुभेच्छा तुम्ही यशस्वी झालात. मी हे स्पष्ट करु इच्छिते की, हे कुठल्या एक-दोन लोकांबाबत नाहीये. तर हे जगातील त्या लोकांसाठी आहे, जे मला माझे खासगी जीवनही जगू देत नाहीयेत.’

नेहा कक्कर ही अभिनेता हिमांश कोहलीसबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘यारियां’ या सिनेमापासून यांच्यात जवळीक वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. काहीच दिवसांपूर्वी ज्या कार्यक्रमात नेहा जज आहे तिथे हिमांश आला होता. यावेळी नेहाने अप्रत्यक्षपणे तिच्या आणि हिमांशच्या नात्याची कबुली दिली होती.

त्यानंतर या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अलफॉलो केले, यानंतर यांच्यांत ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. तसेच नेहाने तिचे हिमांशसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले. इतकचं नाही तर एका मुलाखती दरम्यान जेव्हा नेहाला हिमांशबाबत प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तिने हिमांशला ओळखण्यासही नकार दिला.

या दोघांचं नातं तुटल्यापासून नेहा नेहमीच तिची मनस्थिती दर्शवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI