Video : नेहा कक्करचा लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि इंडियन आयडल शोची परीक्षक नेहा कक्करचा लहानपणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Neha Kakkar Video viral).

Video : नेहा कक्करचा लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या (Neha Kakkar) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याआधी तिच्या लग्नासंबंधी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता तिने लग्नाचा मुहूर्तही ठरवला असल्याचं बोललं जात आहे.
सचिन पाटील

| Edited By:

Oct 13, 2020 | 1:50 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि इंडियन आयडल शोची परीक्षक नेहा कक्करचा लहानपणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Neha Kakkar Video viral). सोशल मीडियावर नेहा नेहमी अॅक्टिव्ह असते. तीन नुकतेच तिच्या लहानपणीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. नेहा नेहमी आपल्या चाहत्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते (Neha Kakkar Video viral).

नेहा कक्करने बऱ्याचदा टीव्ही स्क्रीन आपल्या स्ट्रगल्सबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. नेहाने सांगितले की, “लहानपणापासून ती स्ट्रगल्स करत आहे”. याचाच एक व्हिडीओ तीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. नेहाचा लहानपणीचा व्हिडीओ आणि आवाज ऐकून प्रत्येक जण तिचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, नेहाने पोस्ट केलेला व्हिडीओ हा लहानपणीचा आहे. जेव्हा ती जागरणमध्ये जाऊन गाणी गात होती. व्हिडीओमध्ये नेहाने निळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. छोटीशी नेहा जागरणात गाणी हात आहे. या व्हिडीओमध्ये नेहाचा आत्मविश्वास बघण्यासारखा आहे.

हा व्हिडीओ नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओसह नेहाने कॅप्शन दिले आहे, कायम तुमच्या सर्वांवर मी प्रेम करेन.

नेहाच्या चाहत्यांना तिचा लहानपणीचा व्हिडीओ खूप आवडत आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडीओवर 38 हजार 106 व्ह्यूज आले आहेत. इन्स्टाग्रामवर नेहाला 16 हजार पेक्षा अधिक लोक फॉलो करत आहेत.

संबंधित बातम्या :

Riteish Deshmukh | ‘सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही’, रितेश देशमुख रियाच्या समर्थनार्थ मैदानात!

रणबीर आणि आलियाचं यंदा कर्तव्य नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें