आज से ये सॅनिटायजर कहलाएगा, लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या बाळाचं नामकरण सॅनिटायजर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (child baby name sanitizer uttar pradesh) आहे.

आज से ये सॅनिटायजर कहलाएगा, लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या बाळाचं नामकरण सॅनिटायजर


लखनऊ : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (child baby name sanitizer uttar pradesh) आहे. त्याोसबत या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सॅनिटायजरचा वापर करत आहेत. या लॉकडाऊन दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एका नवजात बालकाचा जन्म झाला. लॉकाडाऊन काळात जन्म झाल्याने या बालकाचं नाव सॅनिटायजर ठेवण्यात आलं (child baby name sanitizer uttar pradesh) आहे.

उत्तर प्रदेशच्या सहानपूर येथे या नवजात बालकाचा जन्म झाला आहे. सॅनिटायजर नाव ठेवल्याने सर्वत्र या बालकाच्या नावाची चर्चा सुरु आहे. या नावासह लॉकडाऊन लोकांच्या कायम लक्षात राहिल, अस या नवजात बालकाच्या वडिलांनी सांगितले.

छत्तीसगडमध्येही एका कुटुंबाने जुळ्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड अशी ठेवली आहेत. 27 मार्च रोजी छत्तीसगडमधील आंबेडकर रुग्णालयात या जुळ्या मुलांचा जन्म झाला.

“इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण देश बंद आहे. ट्रेनही बंद आहेत. प्रत्येकजण आपल्या घरात बसले आहेत. अशामध्ये मी जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांची नावं मी कोरोना आणि कोविड ठेवली आहेत. मला जुळी मुलं झाल्याचा खूप आनंद होत आहे. हा दिवस मी कधी विसरु शकत नाही”, असं जुळ्या मुलांची आई प्रितीने सांगितले.

मध्य प्रदेशातही एका मुलाचा लॉकडाऊन दरम्यान जन्मा झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्या मुलाचे नाव लॉकडाऊन असं ठेवले आहे. तर काहीदिवसांपूर्वी लोकसभेत नागरिकता बिल पास झाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या नवीन जन्म घेतलेल्या मुलीचे नाव नागरिकता ठेवले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI