शिवसेनेने विश्वासघात केला, गडकरींचा हल्ला, झेडपीसाठी 2 दिवसात 7 सभा

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. नागपूर जिल्हा परिषद भाजपसाठी महत्वाची आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेने विश्वासघात केला, गडकरींचा हल्ला, झेडपीसाठी 2 दिवसात 7 सभा
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 6:31 PM

नागपूर : “राज्यात सत्तेसाठी केलेली युती महाराष्ट्राला पटणारी नाही. जनतेत नाराजी आहे. ही अभद्र युती जनतेला पसंत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला निवडून द्या” असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari attack on Shiv Sena) यांनी केलं. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने गडकरींच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली.(Nitin Gadkari attack on Shiv Sena)

यावेळी गडकरींनी शिवसेनेवरही हल्ला चढवला. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्हाला  (भाजप) 105 जागा मिळाल्या. शिवसेनेसोबत युती होती, मात्र शिवसेनेने विश्वासघात केला. सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांना न पाहाणारे गळ्यात गळा घालून फिरत आहेत” अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. नागपूर जिल्हा परिषद भाजपसाठी महत्वाची आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरींनी काल 5 सभा तर आज दोन सभा घेतल्या.

जुन्या सरकारने 60 वर्षांच्या काळात जे केलं नाही ते भाजपने 5 वर्षांच्या काळात करून दाखवलं, असा दावा गडकरींनी केला.

आम्ही जाती-पातीचा विचार करत नाही, आमच्या योजनांचा फायदा प्रत्येकाला झाला पाहिजे याचा विचार आम्ही करतो. काही पक्षात खासदारांचा मुलगा खासदार आणि मंत्र्यांचा मुलगा मंत्री अशी परंपरा आहे, ते मी मनात नाही. माझी पत्नी किंवा मुलगा मतं मागायला येत नाहीत, जनतेचा विकास हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन गडकरी यांनी केलं.

संबंधित बातम्या  

बेईमान सरकार सहा महिन्यात कोसळेल, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.