पेट्रोल-डिझेलच्या भावात सर्वसामान्यांना मोठा दिलासा, काय आहे 1 लीटरचा दर

पुढच्या महिन्यात 7 प्रमुख शेल फॉर्मेशन्समध्ये तेलाच्या उत्पादनात 1,21,000 बॅरल कपात होईल. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलच्या भावात सर्वसामान्यांना मोठा दिलासा, काय आहे 1 लीटरचा दर

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात एकीकडे सोन्याच्या किंमती घसरल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे भावही गेल्या काही दिवसांमध्ये स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा आहे. सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये स्थिरता पाहायला मिळाली. तेल कंपन्यांनी भावामध्ये कोणतीही वाढ न केल्यामुळे नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आज अनेक महानगरांमध्ये इंधनांच्या भावांत कोणतेही बदल झाले नाहीत. (no change petrol diesel price on 19 october 2020 check todays rates here)

दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 81.06 रुपये आहे तर डिझेलची किंमती 70.46 रुपये आहे. अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एईआय) च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात 7 प्रमुख शेल फॉर्मेशन्समध्ये तेलाच्या उत्पादनात 1,21,000 बॅरल कपात होईल. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत बाजारात (Domestic Market) सध्या पेट्रोकेमिकल्सच्या किंमतीवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही.

आज तुमच्या शहरांध्ये काय आहे पेट्रोल-डिझेलच्या किंमती? 1 लीटर पेट्रोलचे भाव

दिल्ली – 81.06 मुंबई – 87.74 चेन्नई – 84.14 कोलकाता – 82.59 नोएडा – 81.58

प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता बदलते किंमत खरंतर, प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होते. सकाळी दिवसभरातील नवे दर लागू होतात. पेट्रोल व डिझेलच्या दरात उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून ठरवले जातात. इतकंच नाही तर परदेशी विनिमय दरासह क्रूडचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहेत यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज ठरवले जातात.

अशी प्रकारे चेक करा तुमच्या शहरातले दर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तुम्ही SMS करूनही मिळवू शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबरवर पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड हा वेगवेगळा असतो, त्यानुसार, तुम्हाला किंमत कळेल.

इतर बातम्या – 

Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा

रायफलमधून चुकून झाली फायरिंग, मुंबईत शिपायाचा जागीच मृत्यू

(no change petrol diesel price on 19 october 2020 check todays rates here)

Published On - 8:34 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI