प्रियांका गांधींसोबत गैरवर्तन, नोएडा पोलिसांकडून खेद व्यक्त, चौकशीचे आदेश

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या सोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. (Noida police profoundly regrets the incident happened with Priyanka Gandhi)

प्रियांका गांधींसोबत गैरवर्तन, नोएडा पोलिसांकडून खेद व्यक्त, चौकशीचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 10:42 PM

नोएडा: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या सोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी ट्विटद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत घडलेल्या गैरवर्तन प्रकरणी भूमिका स्पष्ट केली. (Noida police profoundly regrets the incident happened with Priyanka Gandhi)

नितीन राऊत यांनी प्रियांका गांधींचा फोटो ट्विटरवर शेअर करत उत्तर प्रदेश पोलिसांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. “कायद्याचे जानकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घ्यावी. पोलिसांच्या कार्यपद्धती मार्गदर्शिकेनुसार, कोणत्याही पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्याही महिलेला सार्वजनिकरित्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श करता येत नाही. प्रियांका गांधी सोबत घडलेली घटना कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या योग्य आहे का? उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या पोलिसाला शिक्षा होईल का याचे उत्तर द्यावे, असे ट्विट नितीन राऊत यांनी केले होते.

नोएडा पोलिसांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रियांका गांधींसोबत घडलेल्या घटनेवर खेद व्यक्त केला.”डीएनडी उड्डाणपुलावर अनियंत्रित गर्दीला नियंत्रित करताना प्रियांका गांधींसोबत घडलेल्या घटनेबद्दल नोएडा पोलीस खेद व्यक्त करत आहेत. पोलीस उपायुक्त कार्यालयाने याचे स्वत:हून दखल घेतली आहे. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नोएडा पोलीस कटिबद्ध आहेत. महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे,” असे नोएडा पोलिसांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

प्रियांका गांधी शनिवारी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी असताना डीएनडी उड्डाणपुलावर रोखण्यात आले होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रियांका गांधींसोबत गैरवर्तन झाल्याने यूपी पोलिसांवर टीका करण्यात होत होती.

संबंधित बातम्या:

प्रियांका गांधींची पोलिसांनी पकडली कॉलर, भाजपवालो करारा जबाब मिलेगा – सत्यजित तांबे

न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले

(Noida police profoundly regrets the incident happened with Priyanka Gandhi)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.