नथ मिळवण्यासाठी नाक कापलं

रायबरेली:  नाकातील नथ चोरण्यासाठी मृतदेहाचं नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे नातेवाईकांनी रुग्णालयावर संशय घेतला आहे. या प्रकारानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिस याबाबत नातवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकारानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. […]

नथ मिळवण्यासाठी नाक कापलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

रायबरेली:  नाकातील नथ चोरण्यासाठी मृतदेहाचं नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे नातेवाईकांनी रुग्णालयावर संशय घेतला आहे.

या प्रकारानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिस याबाबत नातवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकारानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रायबरेलीमधील कृष्णा नगर परिसरात राहणाऱ्या रामसिद्ध यादव यांच्या सुनेनं मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी चौकशी करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र यावेळी तिचे नाक गायब असल्याची तक्रार नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रात्रीच्या वेळी उंदरांने तिचे नाक चावले असेल असं कारण दिले. यावरुन नातेवाईकांनी  संतप्त होत रुग्णालयाविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

जेव्हा मी माझ्या सुनेला पोस्टमार्टमसाठी घेऊन आलो, तेव्हा तिच्या नाकात सोन्याची नथ होती. परंतु त्यानंतर तिचा मृतदेह घेण्यासाठी आलो असता, तिचे नाक आणि नथ दोन्ही गायब होते असे रामसिद्ध यादव यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.