आता विमानासारखी रेल्वेची तिकीट बुकिंग होणार

नवी दिल्ली : रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की, विमानांच्या सहज सोप्या तिकीट बुकिंग पद्धतीप्रमाणे रेल्वे तिकीट बुकिंग पद्धत सुरु करावी. सध्याच्या पद्धतीनुसार रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. तात्काळ तिकीट बुक करताना येणाऱ्या समस्य़ांचा त्रास […]

आता विमानासारखी रेल्वेची तिकीट बुकिंग होणार
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की, विमानांच्या सहज सोप्या तिकीट बुकिंग पद्धतीप्रमाणे रेल्वे तिकीट बुकिंग पद्धत सुरु करावी.

सध्याच्या पद्धतीनुसार रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. तात्काळ तिकीट बुक करताना येणाऱ्या समस्य़ांचा त्रास आतापर्यंत प्रत्येकाने सहन केला आहे. त्यातच राखीव जागेची तिकीट बुकिंग करताना बऱ्याचदा आपल्या आवडीच्या जागा मिळत नाही. या गोष्टी लक्षात घेऊन पियुष गोयल यांनी नवीन कार्यप्रणाली सुरु करणार असल्याचे सांगितले. यामुळे तिकीट बुक करताना प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. सहज ते आपले तिकीट बुक करु शकतील, तसेच कोणती जागा मिळणार आहे आणि कोणत्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करायची आहे याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळेल.

सूत्रांनुसार, रेल्वे मंत्रालय यासाठी ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम’ सोबत बैठक करणार आहे. या बैठकीत प्रवाशांना किती सोप्या पद्धतीने तिकीट बुक करता येऊ शकते. तसेच लोकांना तिकीट बुक करताना जागा लाईव्ह दिसाव्यात आणि किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळावी. या विषयांवर ही बैठक होणार आहे.

रेल्वे यावरही विचार करत आहे की, तिकीट बुक करताना तिकिटाची माहिती प्रवाशांच्या मोबाईलवर किंवा इतर कोणत्या डिव्हाईसवर दिली जाईल. चार्ट उपलब्ध करणे रल्वेला अशक्य आहे. चार्टच्या यादीत सर्व प्रवाशांचे नाव आणि नंबर असल्याने यातून कोणत्याही व्यक्तीची माहिती लीक होऊ शकते. यामुळे चार्टमध्ये बऱ्याचदा PNR नंबरचा समावेश असतो.

रेल्वेसाठी अशी सिस्टीम सुरु करणे म्हणजे थोडं कठीण आहे. कारण प्रत्येक ट्रेनचे बरेच थांबे आहेत, जेथे प्रवासी चढतात किंवा उतरतात. अशामध्ये प्रत्येक स्टेशनची माहिती देणे थोडे कठीण होऊ शकते. असं रेल्वेचे अधिकारी सांगतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें