‘तो मी नव्हेच, तेव्हा तर मी झोपलो होतो’, अश्लील व्हिडीओ प्रकरणावर गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

कवलेकर यांच्या मोबाईलद्वारे रविवारी मध्यरात्री Villages of Goa या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ शेअर झाला. | (Obscene clip sent From Goa deputy CM Chandrakant Kavlekar Phone)

'तो मी नव्हेच, तेव्हा तर मी झोपलो होतो', अश्लील व्हिडीओ प्रकरणावर गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

पणजी : गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या मोबाईलमधून एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ शेअर झाल्याने गोव्याच्या राजकीय वातावरणात वादंग निर्माण झाला आहे. मात्र, तो व्हिडीओ आपण शेअर केलेला नसून कुणीतरी मोबाईल हॅक करुन शेअर केल्याचा दावा कवलेकर यांनी केला आहे (Obscene clip sent From Goa deputy CM Chandrakant Kavlekar Phone).

कवलेकर यांच्या मोबाईलद्वारे रविवारी मध्यरात्री Villages of Goa या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ शेअर झाला. मात्र, तो व्हिडीओ आपण शेअर केला नसून त्यावेळी आपण झोपलो होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मोबाईल हॅक करणाऱ्या इसमाला पकडून योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे (Obscene clip sent From Goa deputy CM Chandrakant Kavlekar Phone).

हेही वाचा : इमरती देवींचं नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ

दरम्यान, अश्लील व्हिडीओ शेअर झालेल्या ग्रुपमध्ये महिलादेखील होत्या. यामध्ये काही महिला गोवा फॉरवर्ड पार्टीशी संबंधित आहेत. या महिलांनी कवलेकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी कवलेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर कलम 67, 67 ए आणि 354 ए अंतर्गत कवलेवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

‘मला बदनाम करण्याचे प्रयत्न’

दरम्यान, या प्रकरणावर चंद्रकांत कवलेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “काही लोकांनी माझा मोबाईल हॅक करुन Villages of Goa या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर वादग्रस्त अश्लील व्हिडीओ शेअर केला. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य केलं आहेत. माझी आब्रू धूळीला मिळवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. मी या लोकांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे”, अशी प्रतिक्रिया कवलेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हेही वाचा : मध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर इमरती देवींची टीका, तर भाजपकडून मौन धारण करुन निषेध

Published On - 3:13 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI