वडिलांच्या सांगण्यावरुन मुलाकडून आईची हत्या, फरार आरोपींना कागदाच्या तुकड्यावरुन शोधलं

वडिलांच्या सांगण्यावरुन मुलाकडून आईची हत्या, फरार आरोपींना कागदाच्या तुकड्यावरुन शोधलं

मुंबई : नालासोपाऱ्यात वडिलांच्या सांगण्यावरुन सख्ख्या मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. 21 जानेवारी रोजी हत्या करुन वडील आणि मुलगा फरार झाले होते. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मृतदेहाजवळ एक मोबाईल नंबर मिळाला होता, या नंबरवरुन पोलिसांनी हत्येचा छडा लावून राम मिलन राम प्यारे आणि महेश कुमार  याआरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान  वडिलांच्या सांगाण्यावरुन मुलाने आपल्या चुलत भावाच्या मदतीने आईची हत्या केल्याचं समोर आलं.

नालासोपारा पोलिसांना 21 जानेवारी रोजी एका अज्ञात महिलेची गळा आवळून आणि धारदार हत्याराने वार करुन फेकलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असता, मृतदेहाच्या अंगावरील निशाणांवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र  मृतदेह हा पाण्यात सडला होता त्यामुळे ओळख पटणे कठीण होते. पण त्याच मृतदेहाच्या कपड्यात पोलिसांना एक कागदाची चिट्टी सापडली होती, त्यावर एक मोबाईल नंबर लिहिला होता आणि तोच एक धागा पकडून पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावरुन मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले. कुसुम प्रजापती असं या मृत महिलेचं नाव असल्याचे तपासात निष्पन्न  झाले.

नालासोपारा पूर्व संतोषभुवन या परिसरातील हवाईपाडा इथे त्या राहत होत्या, तर अंधेरी येथील साकिनाका येथे त्या एका कंपनीत काम करत होत्या. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. ही हत्या मयत महिलेच्या पतीच्या सांगण्यावरुन तिच्या मुलानेच केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. नालासोपारा पोलिसांनी महिलेचा पती, मुलगा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

राम मिलन राम प्यारे प्रजापती असे पतीचे नाव असून महेश कुमार असे हत्या करणाऱ्या  मुलाचे नाव आहे. आरोपी राम प्रजापती हा नालासोपारा संतोषभुवन हवाईपाडा इथला रहिवासी आहे. त्याची तीन लग्न झाली आहेत. त्याची पहिली पत्नी मूळगावी उत्तर प्रदेश इथे आहे, तर दोन्ही पत्नींना घेऊन तो नालासोपारा येथे राहत होता. दोन्ही पत्नी वेगवेगळ्या रुममध्ये राहत होत्या. मयत कुसुम हिला चार मुलं आहेत. ती मुलं आईसोबत न राहता ते आपल्या वडिलांसोबत तिसऱ्या आईसोबत राहत होते. मयत कुसुम ज्या रुममध्ये राहत होती. ती रुम पतीने 2 वर्षांपूर्वी 6 लाख रुपयांना विकली होती. पण कुसुम त्या रुमचा ताबा सोडत नव्हती. या कारणावरुन तिचा पतीसोबत नेहमी वाद होत होता. शेवटी तिच्या पतीने त्यांच्या मुलांना आईविरुद्ध भडकावून 21 जानेवारी रोजी गळा आवळून आणि नंतर हत्याराने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर मुलाने आपल्या वडिलांना फोन करुन आईच्या हत्येची माहिती दिली आणि तिथून फरार झाला होता.

Published On - 9:09 am, Sat, 9 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI