पाणी फाउंडेशनसाठी कंगना राणावतकडून एक लाखांची देणगी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पाणी फाऊंडेशनला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. हे पैसे पाणी फाऊंडेशनच्या जलमित्र कॅम्पेनसाठी वापरले जातील, अशी माहिती कंगनाची बहीण रंगोलीने ट्विटरवरुन दिली. अभिनेता आमीर खान पाणी फाऊंडेशन संस्थेचा संस्थापक आहे. या संस्थेच्या मध्यमातून देशभरात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “कंगनाने एक लाख रुपये आणि […]

पाणी फाउंडेशनसाठी कंगना राणावतकडून एक लाखांची देणगी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पाणी फाऊंडेशनला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. हे पैसे पाणी फाऊंडेशनच्या जलमित्र कॅम्पेनसाठी वापरले जातील, अशी माहिती कंगनाची बहीण रंगोलीने ट्विटरवरुन दिली. अभिनेता आमीर खान पाणी फाऊंडेशन संस्थेचा संस्थापक आहे. या संस्थेच्या मध्यमातून देशभरात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “कंगनाने एक लाख रुपये आणि मी एक हजार रुपये पाणी फाऊंडेशनला दान केले आहेत. कृपया तुम्हालाही शक्य असल्यास दान करा. गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या ‘अर्थ डे’निमित्त भूमीपुत्रांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.”

रंगोलीने दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कंगना राणावत आणि रंगोलीचे नाव दिसत आहे. रंगोलीने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, “भारताला स्वतंत्र मिळाले. मात्र इंग्रजांच्या काळातील धोरणे अजून बदलली नाहीत. आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळीही कंगनाने शेतकऱ्यांना मदत केली होती.”

पाणी फाउंडेशन संस्थेच्या माध्यामातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत केली जाते. तसेच पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. यासोबत पाण्याची बचत आणि पाणी आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दलची माहिती नेहमी या संस्थेमार्फत दिली जाते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.