लग्नात घोडा नाचवताना एकाचा मृत्यू

लग्नात घोडा नाचवताना एकाचा मृत्यू

सोलापूर : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यात घोड्याला नाचण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेमुळे माढा तालुक्यातील अंजनगाव येथील एका व्यक्तीचा हकनाक जीव गेला आहे. त्यामुळे लग्न सभारंभात घोडा नाचवण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. सोलापूरातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील किसन वाघमोडे यांच्या घरी लग्नीघाई सुरु होती. लग्नातील धार्मिक विधीसाठी […]

Namrata Patil

|

May 30, 2019 | 6:19 PM

सोलापूर : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यात घोड्याला नाचण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेमुळे माढा तालुक्यातील अंजनगाव येथील एका व्यक्तीचा हकनाक जीव गेला आहे. त्यामुळे लग्न सभारंभात घोडा नाचवण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

सोलापूरातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील किसन वाघमोडे यांच्या घरी लग्नीघाई सुरु होती. लग्नातील धार्मिक विधीसाठी नवरदेव घोड्यावरुन मंदीरात गेला. नवरदेव धार्मिक विधीसाठी आणि ग्रामदेवताच्या दर्शनासाठी घोड्यावरुन गेले. त्यावेळी गावकऱ्यांनी नवरदेवाचा घोडा बँडच्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली. घोड्याच्या तालावर नाचत असताना अचानक घोडा बिथरला आणि त्यानंतर बिथरलेल्या घोड्याने पाठीमागे उभ्या असलेल्या अनिल गायकवाड यांना जोरात लाथ मारली.

घोड्याने मारलेल्या लाथेमुळे अनिल जमिनीवर कोसळले. त्यानंतर अनिल यांना उपचारासाठी जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अनिल गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून गावात राहतात. गावात लग्नकार्य असल्याने ते नवरदेवासोबत गेले होते. घोडा नाचवण्याच्या प्रथेवेळी ते उभे होते. मात्र घोड्याने लाथ मारल्यामुळे त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीयांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी गायकवाड कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान घोडा नाचवणाऱ्या व्यक्ती दारु प्यायला होता. त्यामुळे त्याच्या हाथातील लगाम सुटला आणि घोडा बिथरला. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ग्रामीण भागात लग्न समारंभात घोडा नाचवण्याची विचित्र आणि अघोरी प्रथा आहे. कधी नवरदेवाला घोड्यावर बसवून किंवा कधी नवरा घोड्यावर नसताना बँडच्या तालावर घोड्याला नाचविले जाते. घोड्याला नाचताना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जमते. या कारणामुळे अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे ही प्रथा तात्काळ बंद करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें