Yog Day : अमित शाहांच्या योगानंतर लोकांनी चटई पळवल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणातील रोहतकमध्ये योगासाधना केली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही अमित शाहांसोबत उपस्थित होते.

Yog Day : अमित शाहांच्या योगानंतर लोकांनी चटई पळवल्या


चंदीगड : देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी आज योग दिनी प्रात्यक्षिकं दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणातील रोहतकमध्ये योगासाधना केली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही अमित शाहांसोबत उपस्थित होते.

अमित शाह, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी योगासने केल्यानंतर, हरियाणात अजब प्रकार घडला. योगाचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित नागरिकांनी बसण्यासाठी दिलेल्या चटईंवर डल्ला मारला. बसलेल्या चटया अनेकांनी पळवून नेल्या. चटया उचलण्यासाठी एकच झुंबड उडाली.

रोहतकमध्ये योग कार्यक्रमासाठी खास तयारी करण्यात आली होती. हजारो लोकांना योगासन करताना बसण्यासाठी किंवा योगा करताना चटई देण्यात आली होती. मान्यवरांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम पार पडला. मात्र अनेकांचा डोळा बसण्यासाठी दिलेल्या चटईवर होता. कार्यक्रम संपल्यानंतर बहुतेकांनी या चटईंवर डल्ला मारत, चटई पळवून नेल्या.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी या चटई चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी वादावादीचा प्रसंग उद्भवला.

दरम्यान, आज जगभरात योग दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात योग करुन, त्याचं महत्त्व पटवून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग गुरु रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

YOGA DAY LIVE : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन   

फोटो : जवानांपासून सेलिब्रिटींपर्यत योग दिनाचा उत्साह 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI