वर्ध्यात शिक्षकाकडूनच विद्यार्थिनींवर अत्याचार, विकृत शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

वर्ध्यात एका विकृत शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत चिमुकल्या विद्यार्थीनींवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

वर्ध्यात शिक्षकाकडूनच विद्यार्थिनींवर अत्याचार, विकृत शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

वर्धा : शिक्षक म्हटलं की भावी पिढी घडवणारा व्यक्ती असंच पाहिलं जातं. मात्र, वर्ध्यात एका विकृत शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत चिमुकल्या विद्यार्थीनींवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Physical abuse of student by teacher). शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सतीश बजाईत असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.

आरोपी सतीश बजाईत वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. तो त्या शाळेत मुख्याध्यापक पदाचाही कार्यभार पाहतो. एवढंच नाही तर हा तो शिक्षक संघटनेचा नेताही असल्याची माहिती आहे. त्याने शाळेतील 2 विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

मागील तीन महिन्यापासून हा घृणास्पद प्रकार सुरु होता. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सिंदी रेल्वे पोलिसांनी तक्रारीनंतर नराधम शिक्षकावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यात एका प्रकरणात कलम 376 (अ, ब), पॉक्सो कलम 6 अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम 354 (अ) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाच्या या कृत्याविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकानेच हे कृत्य केल्यानं शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच अशा विकृत शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Physical abuse of student by teacher

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI