जेएनयूत हल्ला करणारे हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते, आम्ही जबाबदारी स्वीकारतो : पिंकी चौधरी

हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करत पिंकी चौधरी नावाच्या व्यक्तीने जेएनयू हिंसाचाराची जबाबदारी घेतली आहे.

जेएनयूत हल्ला करणारे हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते, आम्ही जबाबदारी स्वीकारतो : पिंकी चौधरी
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 10:58 AM

नवी दिल्ली : हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करत पिंकी चौधरी नावाच्या व्यक्तीने जेएनयू हिंसाचाराची जबाबदारी घेतली आहे ( Hindu Raksha Dal). भूपेंद्र तोमर उर्फ पिंकी चौधरी (Pinky Choudhary) हा दिल्लीच्या शालीमार गार्डन परिसरात राहतो. सोमवारी (6 जानेवारी) रात्री सोशल मीडियावर पिंकी चौधरींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये ते म्हणाले, जो कोणी देशविरोधी काम करतील त्यांना जेएनयूच्या विद्यार्थ्य़ांप्रमाणे परिणाम भोगावे लागतील (JNU Violence).

पिंकी चौधरींनी जेएनयूच्या हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. “रविवारी रात्री जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरोधात इतकं चुकीचं बोलणं बरोबर नाही. अनेक वर्षांपासून जेएनयू कम्युनिस्ट दलांचा अड्डा बनलेला आहे”, असं पिंकी चौधरींनी या व्हिडीओत म्हटलं.

“जेएनयूमध्ये रविवार रात्री जो हल्ला झाला, ते सर्व हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते”, असा दावा पिंकी चौधरींनी केला. पिंकी चौधरींवर यापूर्वीही आप कार्यालयावर हल्लासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत, यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जेएनयूत हिंसाचार, 40 हून जास्त विद्यार्थी, शिक्षक जखमी

जवाहर लाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Attack on JNU Studetns and Teachers). तोंड झाकलेल्या हल्लेखोरांच्या हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या होत्या. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. याव्यतिरिक्त 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. यात 30 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचा समावेश आहे (Attack on JNU Studetns and Teachers). जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या हिंसाचारानंतर संपूर्ण देशातील विद्यार्थी जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात एकवटले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात या हिंसाचाराविरोधात आंदोलनं सुरु आहेत. विद्यार्थीच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि राजकीय मंडळी, समाजिक कार्यकर्तेही या घटनेचा निषेध करत आहेत.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.