पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवर संभाषण, पाकिस्तान निशाण्यावर

सोमवारी दोन्ही नेत्यांनी (PM Modi Donald Trump) जवळपास 30 मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. काही नेत्यांचा भारताविषयी हिंसेचा दृष्टीकोन शांती प्रक्रियेसाठी घातक असल्याचं मोदी म्हणाल्याचं पीएमओकडून सांगण्यात आलंय.

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवर संभाषण, पाकिस्तान निशाण्यावर

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (PM Modi Donald Trump) यांचं पहिल्यांदाच संभाषण झालं. सोमवारी दोन्ही नेत्यांनी (PM Modi Donald Trump) जवळपास 30 मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. काही नेत्यांचा भारताविषयी हिंसेचा दृष्टीकोन शांती प्रक्रियेसाठी घातक असल्याचं मोदी म्हणाल्याचं पीएमओकडून सांगण्यात आलंय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद संपवणं गरजेचं आहे आणि सीमेपलिकडून येणारा दहशतवाद रोखल्याशिवाय हे शक्य नाही, या गोष्टीवरही मोदींनी जोर दिला.

यापूर्वी चीनने पाकिस्तानच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताविरोधात बैठक घेतली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बैठकीत अमेरिकेचं समर्थन मिळावं यासाठी इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोनही केला होता. पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामध्ये अजू पाकिस्तानला कुठेही यश आलेलं नाही.

कोणताही देश शांततेच्या मार्गाने चालत असेल, तर त्यांची साथ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. याच मार्गाने गरीबी, निरक्षरता आणि आरोग्यासंबंधी समस्येशी लढलं जाऊ शकतं, असं मोदी म्हणाले. मोदींनी अफगाणिस्तानच्या 100 व्या स्वातंत्र्यदिनाचाही उल्लेख केला. सुरक्षित, संघटीत, लोकशाही आणि वास्तविक गोष्टींसाठी अफगाणिस्तानसाठी काम करण्यास तयार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराविषयी देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. व्यापारप्रश्नी दोन्ही देशांचे वाणिज्यमंत्री लवकरच संवाद साधतील याबाबत निर्णय घेण्यात आला. शिवाय पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नियमित संवाद राहिल याबाबतही संभाषण झालं.

संबंधित बातम्या :

दक्षिण कोरियात भाजप नेते आणि पाकिस्तानी समर्थक भिडले

इम्रान खान यांनी मदतीसाठी फोन केला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘तुमचं तुम्ही पाहून घ्या’

UNSC : सय्यद अकबरुद्दीन पाक पत्रकाराच्या जवळ गेले, शिमला करार सांगितला

चीन विसरला – ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते’

UNSC बैठकीत चीनला पाकिस्तानचा पुळका, रशिया भारतासाठी मैदानात

UNSC ची 48 वर्षांनी काश्मीर प्रश्नावर बैठक, ‘या’ कारणामुळे भारत निश्चिंत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI