दिल्लीतील हिंसाचारावर अखेर मोदींनी मौन सोडलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व प्रकरणावर अखेर मौन सोडलं. मोदींनी या प्रकरणी ट्वीट करत नागरिकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे

दिल्लीतील हिंसाचारावर अखेर मोदींनी मौन सोडलं

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार (PM Modi On Delhi Violence) उफाळला आहे. एकीकडे हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे तणावग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व प्रकरणावर अखेर मौन सोडलं. मोदींनी या प्रकरणी ट्वीट करत नागरिकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

“दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी परिस्थिती आहे, त्याचा समग्र आढावा घेतला. पोलीस आणि इतर एजन्सी शांतता राखण्यासाठी काम करत आहेत”, असं ट्वीट मोदींनी केलं (PM Modi On Delhi Violence).

तसेच, त्यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं, “मी सर्व बंधू-भगिनींना विनंती करतो की त्यांनी शांतता आणि बंधुता टिकवून ठेवावी. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.”

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू 

दिल्ली गेल्या दोन दिवसांपासून धुमसत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. राजधानीच्या ईशान्य भागातील हिंसाचारात आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे, तर पोलिसांसह जवळपास 200 नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि आयबी जवानाचा देखील समावेश आहे. दिल्ली हिंसाचाराला नियंत्रित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर आहे.

दरम्यान, डोभाल यांनी मंगळवारी (25 फेब्रुवारी) रात्री सीलमपूरच्या डीसीपी ऑफिसला जाऊन तिथल्या वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर डोभाल यांनी शांती प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना मोकळीक दिली.

दुसरीकडे, गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) 24 तासांत तीन उच्च स्तरीय बैठका घेतल्या (PM Modi On Delhi Violence). तर डोभाल यांनी पंतप्रधानांची भेट घेत त्यांना सद्य स्थितीची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

दिल्ली शांत करण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा मैदानात

दिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा, मोदी-केजरीवालांना 5 प्रश्न : सोनिया गांधी

दिल्ली पेटली, हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 200 जखमी

Delhi Riots : CAA वरुन राडा, गोळीबार करणाऱ्याला बेड्या, दिल्ली नेमकी का धुमसतेय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI