पुण्यात बस कंडक्टर्सकडून गंडवागंडवी, प्रवाशांना तिकीट देताना हातचलाखी

बनावट तिकिटांच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएल वाहकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यात बस कंडक्टर्सकडून गंडवागंडवी, प्रवाशांना तिकीट देताना हातचलाखी
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 4:53 PM

पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या  बसने (PMPML Ticket fraud) प्रवास करताय? सावधान. वाहकाने घाईघाईने दिलेले तिकीट हे अधिकृत तिकीट नसून स्वाईप मशीन नादुरुस्त असल्याचे दर्शविणारी ती पावती असू शकते. अशाप्रकारे वाहकाकडून हातचलाखीने ‘नॉट फॉर सेल’च्या वाया गेलेल्या ‘डमी’ कागदाचा तुकडा प्रवाशाच्या हातावर टेकवला जात आहे. या बनावट तिकिटांच्या (PMPML Ticket fraud) माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपी वाहकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा बनावट तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांना लुटणाऱ्या 20 वाहकांवर मागील आठवड्यांत पीएमपी प्रशासनाने निलंबनाची कारवाई करून कसून चौकशी सुरू केली.

बहुतांश प्रवासी तिकीट न पाहताच थेट खिशात ठेवतात. तिकीट ठळक प्रिंट नसल्यास वाहकाला कोणी जाबही विचारताना दिसत नाहीत. मात्र, प्रवाशांना याची किंचीतही कल्पना नसते की, वाहकाने आपल्या पैशांवर डल्ला मारला आहे. या माध्यमातून हजारो रुपयांची गंगाजळी वाहकांनी आतापर्यंत हडप केली आहे.

पिंपरी आणि पुण्यामध्ये धावणाऱ्या सर्व बसमधून या तिकिटांच्या स्वाईप मशिनची तपासणी केल्यानंतर हा प्रकार पीएमपी अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आहे. अशिक्षित आणि अज्ञानी प्रवासी पाहून ही शक्कल अनेकदा वाहकांकडून लढविली जाते. पास नसलेल्या ज्येष्ठांनाही अशा पद्धतीचे तिकीट देऊन पैसे उकळले जात आहेत. ग्रामीण मार्गावर तर वाहक बनावट तिकिटावर स्वत:च्या हातानेच रक्कम टाकून पैसे लाटत असल्याचेही उघडकीस आले आहे.

तिकिटांच्या पैशात ही रक्‍कम ग्राह्य न धरता थेट वाहकांचा खिशात जाते. याचा फटका पीएमपीच्या उत्पन्नाला बसतो. नागरिकांनी तिकिटांची तपासणी करीत राहावी. ठराविक मार्गावरील बससाठी तिकीट किती आहे, याची विचारणा आणि शहानिशा प्रवाशांनी करावी. निलंबित केलेल्या वाहकांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. दोषींना माफ केले जाणार नाही. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे, असं पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नॉट फॉर सेल’ तिकीट म्हणजे तिकीट स्वाईप मशिनमध्ये बिघाड झाल्यास ट्रायल किंवा डमी तिकीट मशिनमधून काढले जाते. मशिन सुरू आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ट्रायल तिकिटाचा वापर केला जातो. सध्या प्रत्येक वाहकाला एक, अशी आठशे ते एक हजार स्वाईप मशिन आहेत. अशा पद्धतीने वाहकच पीएमपीएलएममध्ये भ्रष्टाचार करत असल्याचे उघड झाले आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.