कामगारानेच केली मालकाची हत्या; अवघ्या पाच तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालकाचीच हत्या करुन गॅरेजमधून कार पळवणाऱ्या कामगाराला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी ( 12 नोव्हेंबर) रात्री ही हत्या करण्यात आली होती.

कामगारानेच केली मालकाची हत्या; अवघ्या पाच तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 5:29 PM

नाशिक : मालकाचीच हत्या करुन गॅरेजमधून कार पळवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासांत बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी ( 12 नोव्हेंबर) रात्री ही हत्या करण्यात आली होती. यावेळी संशयित आरोपी रोशन कोटकर यानेच किरकोळ वादातून आपल्या मालकाचा खून केल्याचे सांगितले जात आहे. शहरातील इंदिरानगर पोलिसांनी ही कारवाई केली. (Police arrested accused man in five hours for killing garage owner)

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा पाथर्डी रस्त्यावरील श्रीजी प्लाझा अपार्टमेंट शेजारी रामचंद्र निषाद यांचे गुरुपकृपा नावाचे गॅरेज आहे. रात्रीच्या सुमारास गॅरेजमध्ये एकटे असल्याने डाव साधत अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॅडने प्रहार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. यावेळी  गॅरेजमधील वर्णा कारही पळवल्याचे सांगण्यात आले होते.

हत्या झाल्याचे कळताच इंदिरानगर पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. पोलिसांच्या डॉग स्कॉड पथकाने खुनाच्या ठिकाणाची पाहणी केली होती. प्रत्यक्ष पुरावे आणि चौकशीच्या आधारावर पोलिसांनी आपला तपास सुरु केला. कामगार कोटकर याचे निषाद यांच्यासोबत किरकोळ वाद झाल्याचेही पोलिसांना तपासातून समजले. त्यामुळे कामगार रोशन कोटकर याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

त्यानंतर पोलिसांनी रोशन कोटकर आणि त्याचा साथीदार महेश लभडे याला येवला येथून ताब्यात घेतलं. पोलिशी खाक्या दाखवताच दोघांनीही खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, अधिक प्रकरणाचा अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत पाळीव कुत्र्याला खाऊ घालणं महागात, रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू

बर्फीत भेसळ, कारखान्यावर धाड, 1 लाख 19 हजारांची बर्फी जप्त

cybercrime | अ‌ॅप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने 9 लाखांना चुना

(Police arrested accused man in five hours for killing garage owner)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.