‘टायगर झिंदा है’मधील या अभिनेत्यासोबत पुजा बत्रा विवाहबंधनात

बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे लग्न समारंभ पाहायला मिळाले. गेल्यावर्षी बॉलिवडूच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि नेहा धुपिया यांनी लग्न केलं.

'टायगर झिंदा है'मधील या अभिनेत्यासोबत पुजा बत्रा विवाहबंधनात

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे लग्न समारंभ पाहायला मिळाले. गेल्यावर्षी बॉलिवडूच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि नेहा धुपिया यांनी लग्न केलं. आता बॉलिवूड अभिनेत्री पुजा बत्राच्याही नावाचा यामध्ये समावेश झाला आहे.

पुजा बत्राने ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात काम केलेला अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केलं आहे, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे. या चर्चेवर अभिनेत्री पुजाने अजून काही उत्तर दिलेले नाही.

पुजा आणि नवाब लवकरच आपल्या लग्नाबद्दल घोषणा करतील, असं म्हटलं जात आहे. या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दोघांचे एकत्रित फोटो शेअर केलेले आहेत.

काही फोटोंमध्ये पुजाच्या हातात लग्नातील बांगड्यांचा चुडा दिसत आहे. यामुळे चाहत्यांनीही लग्न झाले असल्याचे म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे दोघांनी लग्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI