‘समलैंगिक जोडप्यांनाही कुटुंबात राहण्याचा अधिकार, इतिहासात पहिल्यांदाच पोपचं समर्थन

एखाद्या पोपने समलैंगिक संबंधांना (Same-Sex Relations) समर्थन देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे.

‘समलैंगिक जोडप्यांनाही कुटुंबात राहण्याचा अधिकार, इतिहासात पहिल्यांदाच पोपचं समर्थन
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 7:15 PM

व्हॅटिकन सिटी : पोप फ्रांसिस (Pope Francis) यांनी अखेर समलैंगिक नागरी संघांचं (Same-Sex Civil Unions) समर्थन केलंय. एखाद्या पोपने समलैंगिक संबंधांना (Same-Sex Relations) समर्थन देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. पोप फ्रांसिस यांनी बुधवारी (21 ऑक्टोबर) रोम फिल्म फेस्टिवलमध्ये (Rome Film Festival) दाखवण्यात आलेल्या ‘फ्रांसिस्को’ (Francesco) नावाच्या माहितीपटात (documentary) ते म्हणाले, “समलैंगिक जोडप्यांना समान नागरी अधिकार (Equals Rights) मिळायला हवेत’ (Pope Francis Support Same-Sex Relations with equal rights).

या डॉक्युमेंट्रीमध्ये पोप फ्रांसिस यांनी समलैंगिक जोडपे देवाची लेकरं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘समलैंगिक जोडप्यांना देखील कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे. ते केवळ समलैंगिक असल्याने त्यांना कुटुंबापासून वेगळे केलं जाऊ नये. तसेच ते समलैंगिक असल्यानं त्यांचं आयुष्य दयनीय बनवायला नको.’

यावेळी पोप फ्रासिंस यांनी समलैंगिकांसाठी नागरी कायदा तयार करण्याला पाठिंबा दिला. ‘आपल्याला एक नागरी संघ कायदा बनवायला हवा. यात समलैंगिक जोडप्यांना कायद्याचं संरक्षण मिळेल,’ असंही त्यांनी नमूद केलं.

पोप फ्रांसिस यांच्या जीवनावर आधारित ‘फ्रांसेस्को’ या माहितीपटात त्यांच्या सिव्हिल युनियनबाबतच्या मतांसोबतच दोन समलैंगिक पुरुषांना त्यांच्या तीन मुलांसह चर्चमध्ये येण्यास प्रोत्साहन देताना दाखवण्यात आलं आहे. पोप फ्रांसिस यांनी समलैंगिक जोडप्यांच्या समान विवाहालाही पाठिंबा दिला. याआधी कोणत्याही पोपने समलैंगिक संबंधांना पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ही मोठी धार्मिक भूमिका असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

समलैंगिकता आणि व्यभिचार दंडनीय अपराध, सैन्याची संरक्षण मंत्र्यांकडे धाव

अगोदर समलैंगिक असल्याची कबुली, आता बहिणीवर सनसनाटी आरोप

आयुष्मानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’वर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

Pope Francis Support Same-Sex Relations with equal rights Civil Unions

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.