मुंबईत विरोध तर अमरावतीत समर्थन, नागरिकत्व कायद्यावरुन महाराष्ट्रात दोन चित्र

गेल्या काहीदिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (Protest against caa mumbai) रान पेटलं आहे. हा कायदा मंजूर झाल्यापसाून मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि हिंसाचार झाल्याचे पाहिले.

मुंबईत विरोध तर अमरावतीत समर्थन, नागरिकत्व कायद्यावरुन महाराष्ट्रात दोन चित्र

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (Protest against caa mumbai) रान पेटलं आहे. हा कायदा मंजूर झाल्यापसाून मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि हिंसाचार झाल्याचे पाहिले. तर अनेक संघटनांनी, विद्यार्थ्यांनी त्यासोबतच राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरत या कायद्याला विरोध दर्शवला. आज (26 डिसेंबर) मुंबईतही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा (Protest against caa mumbai) काढला आहे. तर अमरावतीमध्ये भाजपच्या नेतृत्वात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाथ मोर्चा काढण्यात आला आहे.

देशभरातून या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला आहे. त्यासोबत आता देशातील अनेक ठिकाणाहून नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाथ मोर्चे निघू लागले आहे. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नुकतेच या कायद्याच्या समर्थनाथ नागपुरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतील दादर टीटी येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढला आहे. येथे सध्या मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जमले आहेत. रस्त्याच्यामध्ये कार्यकर्ते बसल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मोर्चामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांनी आंबेडकरांच्या मोर्चाला परवानगी नाकरली होती, तरी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे पोलीस आंदोलकांवर कारवाई करु शकतील, असं म्हटलं जात आहे. भाजप सरकारविरोधात सध्या जोरदार घोषणाबाजीही देण्यात येत आहे.

अमरावतीमध्येही या कायद्याच्या समर्थनाथ मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येकाच्या हातात भारतीय झेंडा घेतलेला आहे. तसेच हा कायदा मुस्लीम विरोधी नसल्याचेही आंदोलक सांगत आहे.

“एनआरसी-सीएएला आमचा विरोध आहे. मुंबईत 70 टक्के नागरिक शहराबाहेरील, बाहेरच्या राज्यातील आहेत. कोणाकडेही वाडवडिलांचे पुरावे मिळणार नाहीत. त्यांच्या तीन-चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. गाव, तालुका कुठला यांची माहिती नाही. आपले आजोबा-पणजोबा कुठे आणि कधी जन्मले, याचे पुरावे नाहीत, मग ते कागदपत्रं कशी सादर करणार?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना विचारला.

Published On - 2:00 pm, Thu, 26 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI