ओबीसींचं खातं ठेवलंच कशाला? बरखास्त करा; प्रकाश शेंडगे संतापले

ओबीसींच्या समस्या ऐकायला कुणीच तयार नाही. नेत्यांचंही कुणी ऐकत नाही. असाच कारभार सुरू ठेवायचा असेल तर ओबींसींचं खातं बरखास्त करा, असा संताप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.

ओबीसींचं खातं ठेवलंच कशाला? बरखास्त करा; प्रकाश शेंडगे संतापले
भीमराव गवळी

|

Oct 14, 2020 | 2:36 PM

मुंबई: ओबीसींच्या समस्या ऐकायला कुणीच तयार नाही. नेत्यांचंही कुणी ऐकत नाही. एबीसी नेत्यांना सरकार दरबारी किंमत नाही. असाच कारभार सुरू ठेवायचा असेल तर मग ओबींसींचं खातं ठेवलंच कशाला? हे खातं बरखास्त करा, असा संताप ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला. (prakash shendge reaction on obc reservation)

‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी हा संताप व्यक्त केला. २१ जुलै रोजी एक बैठक पार पडली. मेगा भरतीच्या अनुषंगाने ही भरती होती. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवरही चर्चा झाली. यावेळी मेगा भरती सुरू करा आणि ओबीसाला निधी मिळायलाच हवा, अशी मागणी करण्यात आली. धनगर समाजाचा १ हजार कोटींचा निधीही धूळ खात पडला असून ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त उपसमिती स्थापन करण्यात आल्याचंही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं. त्यावेळी आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं, असं शेंडगे यांनी सांगितलं.

ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जाब विचारण्यात आला होता. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला होता. ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, तहसिलदार कार्यालयावर आंदोलन करतानाच रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला होता, असं सांगतानाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही भेटून हीच मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या समस्या ऐकायला कुणी तयार नाही. एबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही. हे असंच ठेवायचं असेल तर ओबीसींचं खातं ठेवलं तरी कशाला? हे खातंच बरखास्त करा, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. (prakash shendge reaction on obc reservation)

संबंधित बातम्या:

Headline | 3 PM | मराठा समाजाच्या दबावाखाली परीक्षा रद्द – प्रकाश शेंडगे

Live Update : मराठ्यांच्या दबावाखाली MPSC परीक्षा रोखणे हा चुकीचा पायंडा : प्रकाश शेंडगे

Prakash Shendge | OBC मध्ये मराठा आरक्षण देऊ देणार नाही, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला इशारा

(prakash shendge reaction on obc reservation)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें