पुलवामातील जवानांच्या पोस्टिंगची माहिती बाळगली, चाकणमधून संशयित दहशतवादी ताब्यात

पुणे : बिहार आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील चाकणमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदाराला चाकणमधून अटक करण्यात आली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती. अटक करण्यात आलेल्या […]

पुलवामातील जवानांच्या पोस्टिंगची माहिती बाळगली, चाकणमधून संशयित दहशतवादी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे : बिहार आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील चाकणमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदाराला चाकणमधून अटक करण्यात आली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती.

अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव शरियत मंडळ असं आहे. बिहारमधील पाटणा जंक्शन येथे बिहार एटीएसने खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून शरियत मंडलचं नाव समोर आलं. यानंतर बिहार एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने या संशयित दहशतवाद्याला अटक केली.

अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी बिहार एटीएसच्या वतीने संशयित आरोपीच्या प्रवास कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला बिहारमध्ये चौकशीसाठी नेण्यासाठी 1 एप्रिल पर्यंत प्रवास कोठडी मंजूर केली आहे.

पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या पोस्टिंगची माहिती या संशयित दहशतवाद्यांकडे कशी आली याबाबत तपास सुरु आहे. बिहारमध्ये अटक केलेले दोघे आणि चाकणमधून ताब्यात घेतलेला शरियत मंडल हे तिघे इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिससह जमीयत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.