पुण्यातील कोव्हिड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, 27 दिवसांपासून मुलगी बेपत्ता, आईचं उपोषण

पुण्यातल्या कोव्हिड सेंटरमधून गेल्या 27 दिवसांपासून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. (Pune Covid Centre Lady Missing)

पुण्यातील कोव्हिड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, 27 दिवसांपासून मुलगी बेपत्ता, आईचं उपोषण
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 8:29 PM

पुणे : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य कोव्हिड सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 27 दिवसांपासून कोव्हिड सेंटरमधून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीची आई उपोषणाला बसली आहे. (Pune Covid Centre Lady Missing)

गेल्या 27 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा तिच्या आईशी संवाद झालेला नाही. त्यामुळे तिची आई अस्वस्थ आहे. रूग्णालय प्रशासन मात्र हात झटकून रिकामं झालं आहे. प्रशासनाकडून योग्य माहिती दिली जात नाही, असा आरोप करत मुलीचा शोध लागेपर्यंत आईने उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

“आमची मुलगी 29 ऑगस्ट रोजी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी भरती झाली होती. 30 तारखेला आम्ही काळजीपोटी रूग्णालयात आलो तर 49 नंबर बेडवर उपचार सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ती बरी झाल्यानंतर आणि तिचा क्वारन्टाईन पिरीयड संपल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं गेलं. 13सप्टेंबरला आम्ही रूग्णालयात गेलो असतो तिला उद्या डिस्चार्ज देणार आहोत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ती आणखीही आमच्या नजरेस पडलेली नाही”, अशा संतप्त भावना मुलीच्या आईने व्यक्त केल्या.

“आमची मुलगी नेमकी आहे कुठे?”, असा आर्त सवाल मुलीचे कुटुंबीय प्रशासनाला वारंवार विचारत आहेत. प्रशासन काही उत्तर देत नसून मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केलीये.

सुरवातीला काहीही न बोलणाऱ्या पुणे महापालिका प्रशासनाने मुलीच्या घरच्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यावर चौकशी केली जाईल, असं नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलंय. याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, “आधी इकडची सर्व्हिस लाईफलाईन संस्थेकडे होती. त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. तसंच त्यांना संबंधित रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल”.

पुण्याच्या याच कोव्हिड सेंटरमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू-

पत्रकार पांडुरंग रायकर यांना याच कोव्हिड सेंटरमधून कार्डियाक अ‌ॅम्बुलन्स न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रूग्णालय प्रशासनाचे पोकळ दावे उघडे पडले. तसंच रूग्णालय प्रशासनाच्या मर्यादा देखील उघड्या पडल्या.

जम्बो कोव्हिड सेंटरमधला भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर सुरू झाल्यापासून येथील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे रूग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रूग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाढत्या तक्रारींमध्ये भर पडतीये. शासन-प्रशासन येथील परिस्थिती कशा प्रकारे सुधारलीये हे सांगण्यात मश्गूल आहे मात्र सामान्य नागरिकांच्या आणि रूग्णांच्या नशिबी निराशाच आहे.

संबंधित बातम्या-

पुण्यातील कोव्हिड परिस्थिती विदारक, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी बेडच नाहीत

पुणेकरांनो शाब्बास, एवढ्या पावसातही जम्बो रुग्णालय तयार करुन दाखवलं : उद्धव ठाकरे

(Pune Covid Centre Lady Missing)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.