पुण्यात वकीलच लाच घेताना सापडला, लाचेची रक्कम ऐकून थक्क व्हाल!

पुण्यात वकीलच लाच घेताना सापडला, लाचेची रक्कम ऐकून थक्क व्हाल!

पुणे : पुण्यातील रोहित शेंडे नावाच्या वकिलाला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पुण्यातील बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. अॅड. रोहित शेंडेने महसूल विभागातील उपसंचालकांच्या कार्यालयातील जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1 कोटी 70 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

पुणे : पुण्यातील रोहित शेंडे नावाच्या वकिलाला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पुण्यातील बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. अॅड. रोहित शेंडेने महसूल विभागातील उपसंचालकांच्या कार्यालयातील जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1 कोटी 70 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बंडगार्डन परिसरात सापळा लावण्यात आला.

5 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि 1 कोटी 65 लाख रुपयांच्या खोट्या नोटा घेऊन तक्रारदार अॅड. शेंडेला भेटला असता, तिथे आधीच दबा धरुन बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अॅड. रोहित शेंडेला रंगेहाथ पकडलं. रोहित शेंडेला आज न्यायालयात हजर केले जाईल.

भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजूने लावून देण्याचे आमिष दाखवत, रोहित शेंडेने वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत, त्यातील 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारली.

दरम्यान, या लाच प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी लिपिकाला ताब्यात घेतले असून, त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें