विमानानं येऊन पुण्यातील मॉलमध्ये चोरी, पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद

हायप्रोफाईल चोऱ्यांची प्रकरणं (High Profile Thieves) अनेकदा सर्वसामान्यांच्या कल्पनेबाहेर असतात. अशा प्रकरणांमध्ये चोरांची माहिती ऐकून भलेभले तोंडात बोट घालतात.

विमानानं येऊन पुण्यातील मॉलमध्ये चोरी, पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 09, 2019 | 8:09 AM

पुणे: हायप्रोफाईल चोऱ्यांची प्रकरणं (High Profile Thieves) अनेकदा सर्वसामान्यांच्या कल्पनेबाहेर असतात. अशा प्रकरणांमध्ये चोरांची माहिती ऐकून भलेभले तोंडात बोट घालतात. पुण्यातही (Pune) असाच प्रकार पहायला मिळाला. विमानानं पुण्यात येऊन मॉलमध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Thieves Gang) पर्दाफाश झाला आहे. पुणे पोलिसांनी या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या. आशिष बिस्त, आकाश ढाका आणि रवींदरसिंग या तीन आरोपींना पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

विमानानं प्रवास करणाऱ्या या टोळीच्या चोरीचं स्वरुप देखील तेवढंच आलिशान आहे. ही टोळी आलिशान मॉलमधील ब्रँडेड घड्याळं, कपडे आणि इतर महागड्या वस्तू चोरत होते. याच टोळीने सेनापती बापट रस्त्यावरील (Senapati Bapat Road) पॅव्हेलियन मॉलमधील (Pavillion Mall) महागडी घड्याळे चोरल्याचंही समोर आलं आहे. या टोळीनं RADO कंपनीच्या 5 लाख रुपये किमचीच्या महागड्या घड्याळांवरही हात साफ केला.

संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. याच टोळीनं इतर दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या टोळीतील काही जणांना मुंबईत जाऊन महागडे टी-शर्ट चोरताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. यावेळी त्यांना पोलीस कोठडी झाली होती.

महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या या टोळीतील अजून 10 ते 12 जण फरार आहेत. या टोळीने मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात चोऱ्या केल्या आहेत. या चोरी करताना ते प्रत्येक शहरात विमानानं प्रवास करतात. शहरात आलिशान लॉजवर राहतात. त्यानंतर शहरातील मोठ्या मॉलची रेकी करुन ब्रँडेड वस्तू चोरून पसार होतात. विशेष म्हणजे सर्व आरोपी सुशिक्षित असून त्यांचे राहणीमान उच्छभ्रू आहे. त्यामुळं ते चोर असल्याचा संशयही येत नव्हता. याचाच फायदा घेऊन ते चोऱ्या करत होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें