पुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला

पुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (Vinayak Shirsat ) यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक शिरसाट यांची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 32 वर्षीय विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणीजवळ मुळशी मुठा घाटात सापडला. विनायक शिरसाट 30 जानेवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.

विनायक शिरसाट हे आरपीआयचे कार्यकर्ते होते. ते शिवणे या गावचे रहिवासी होती. त्यांचा पीओपीचं व्यवसाय होता. शिरसाट यांनी पुण्यातील वारजे आणि आसपासच्या परिसरातील अनेक जमीन घोटाळे बाहेर काढले होते.

त्याच रागातून त्यांच्याशी घातपात झालाय का असा प्रश्न आहे. पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र माहिती अधिकारांवरील हल्ला, हत्येचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी राज्यासह देशभर गाजलेला आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा गूढ कायम आहे.

Published On - 9:36 am, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI