तळोजा एमआयडीसीत अजगरासह 10 अंडी सापडली, सर्पमित्राकडून कृत्रिम उब देत पिलांना जीवदान

तळोजा एमआयडीसीत पावसापासून संरक्षणासाठी आडोसा घेतलेला अजगर 10 अंड्यांसह सापडला आहे (Python with ten eggs in Taloja MIDC Raigad).

तळोजा एमआयडीसीत अजगरासह 10 अंडी सापडली, सर्पमित्राकडून कृत्रिम उब देत पिलांना जीवदान
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 1:14 PM

रायगड : मान्सून पावसाला सुरुवात झाल्यानंतर वन्यप्राण्यांच्या अधिवासातही अनेक बदल होत आहेत. पावसामुळे सरपटणारे प्राणी देखील सुरक्षित ठिकाणं शोधतात. अशाच पद्धतीने तळोजा एमआयडीसीत पावसापासून संरक्षणासाठी आडोसा घेतलेला अजगर सापडला (Python with ten eggs in Taloja MIDC Raigad). या अजगर जातीच्या मादीसोबत जवळपास 10 अंडीही आढळली. यानंतर पनवेलमधील सर्पमित्र संघटना ‘एमएच 46 सेव्ह वाईल्ड लाईफ ग्रुप’च्या सदस्यांनी अजगराला तर जीवनदान दिलेच, शिवाय सापडलेली खराब अवस्थेतील अंडी देखील घरात विशिष्ठ तापमानात उबवून पिलांना जीवदान दिलं. त्यामधून जन्माला आलेल्या 6 पिलांना जंगलात सोडून देण्यात आलं आहे, अशी माहिती सर्पमित्र तेजस उलवेकर याने दिली.

तळोजा एमआयडीसीतील एका कंपनीत अजगर व अजगराची अंडी आढळून आली. संबंधित कंपनीने तातडीने सर्पमित्र तेजस उलवेकर आणि त्याच्या साथीदारांना याची माहिती दिली. यानंतर उलेकर आणि त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी मादी अजगराची स्थिती चांगली होती. मात्र, तेथे असलेल्या अंड्यांपैकी 4 अंडी तेथेच फूटून त्यातील अजगराच्या पिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित सर्पमित्रांनी पनवेल वनविभागाला याची माहिती दिली. तसेच अंडी खराब स्थितीत असून त्यामुळे असलेला अजगराच्या पिलांना धोकाही लक्षात आणून दिला.

यावर वनविभागाने सर्पमित्रांना त्या अंड्यांतील पिलांना आणि अजगराला वाचवण्यास सांगितले. वनविभागाने अजगराची काळजी घेण्यास सांगितल्यानंतर सर्पमित्रांनी या अंड्यांना घरीच उबवून पिलांना वाचवण्याचा निर्णय घेतला. कारण ऐन पावसाळ्याच्या दिवसात निसर्गात या अंड्यांमधील पिलांना अधिक धोका होता.

संबंधित अंड्यांना घरीच उब दिल्यानंतर हळूहळू एकएक अजगराचं पिलू बाहेर येऊ लागलं. अखेर एकूण 7 अंड्यांपैकी 6 अंड्यातून अजगराची पिलं बाहेर आली. यातील एक अंडं मात्र खराब झालं होतं. सर्पमित्रांनी या सर्व 6 पिलांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिलं.

या घटनेनंतर सर्पमित्र तेजस उलवेकर आणि त्याच्यासाथीदारांनी अशाप्रकारे वन्यजीव सापडल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केलं आहे.

हेही वाचा :

Solar Eclipse Live : राजस्थानमधून कंकणाकृती सूर्यग्रहण

Solar Eclipse: सूर्यग्रहण कसं पाहावं, ‘या’ गोष्टी करणं धोकादायक ठरु शकतं

PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो

Solar Eclipse 2020 | ग्रहणकाळात देशभरातील मंदिरे बंद, तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात

Python with ten eggs in Taloja MIDC Raigad

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.