पत्रकारांना सामोरे जा, राहुल गांधींचं मोदींना आव्हान

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधाला आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर एक पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी ट्वीट केले की, ‘आता मोदींनी पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांचा आनंद घेतला पाहिजे.’ तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधीनी […]

पत्रकारांना सामोरे जा, राहुल गांधींचं मोदींना आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधाला आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर एक पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी ट्वीट केले की, ‘आता मोदींनी पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांचा आनंद घेतला पाहिजे.’

तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधीनी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली.

राहुल गांधी यांनी हैदराबाद येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर मोदींना टोमणा मारत एक ट्वीट केले, ‘प्रिय मोदीजी, आता निवडणूक प्रचार पूर्ण झाला आहे. मला आशा आहे की तुम्ही एक पंतप्रधान म्हणून आपल्या पार्ट टाईम जॉबसाठी थोडा वेळ नक्की काढाल.’

‘तुम्हाला पंतप्रधान बनून 1,654 दिवस झालेत. तरी एकही पत्रकार परिषद नाही?’

‘हैदराबाद येथील आजच्या पत्रकार परिषदेचे काही फोटो तुमच्यासाठी शेअर करतो आहे. कधी प्रयत्न करुन बघा. प्रश्नोत्तरांचा सामना करणे मजेशीर असते.’

आता राहुल गांधींच्या या सल्ल्यावर पंतप्रधान मोदी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.