पेणमध्ये मालगाडीखाली चिरडून तिघा तरुणांचा जागीच अंत

25 वर्षीय सुशील वर्मा, 24 वर्षीय सुनील वर्मा आणि 25 वर्षीय निखिल गुप्ता यांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. (Pen Goods Train hits Three men on Railway Track)

पेणमध्ये मालगाडीखाली चिरडून तिघा तरुणांचा जागीच अंत

रायगड : पेणमध्ये तिघा तरुणांना मालगाडीने चिरडल्याची दुःखद घटना समोर आली आहे. रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना चिरडले. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पेण शहराजवळ घडलेल्या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pen Goods Train hits Three men on Railway Track)

25 वर्षीय सुशील वर्मा, 24 वर्षीय सुनील वर्मा आणि 25 वर्षीय निखिल गुप्ता यांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. मात्र हा अपघात आहे की घातपात याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

शनिवारी रात्री सुनील वर्मा, सुशील वर्मा आणि निखिल गुप्ता हे तीन तरुण पेण रेल्वे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर गेले होते. यावेळी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पेण रेल्वे स्टेशनवरुन एक मालगाडी रोह्याच्या दिशेने जात होती.

हेही वाचा : औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

मालगाडीने ट्रॅकवर बसलेल्या या तिघा तरुणांना चिरडले. अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तिघे तरुण रेल्वे रुळावर कशासाठी गेले होते, हा नेमका अपघात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेच्या निमित्ताने औरंगाबादमधील भीषण दुर्घटनेच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये ठीक एक महिन्यापूर्वी घडली होती. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा 8 मे रोजी पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली होती.

(Pen Goods Train hits Three men on Railway Track)

Published On - 10:27 am, Mon, 8 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI