महाराष्ट्रासाठी खुशखबर! शुक्रवारपासून हलक्या पावसाची शक्यता

नागपूर : उन्हाच्या चटक्याने तापलेल्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून कोकणात, तर शनिवारपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचाही अंदाज आहे. विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात 48 डिग्री एवढं जगातलं आजचं सर्वोच्च तापमान […]

महाराष्ट्रासाठी खुशखबर! शुक्रवारपासून हलक्या पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 5:36 PM

नागपूर : उन्हाच्या चटक्याने तापलेल्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून कोकणात, तर शनिवारपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचाही अंदाज आहे.

विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात 48 डिग्री एवढं जगातलं आजचं सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आलंय. त्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय. मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झालाय. पण पुढील वाटचाल संथ झाल्याने महाराष्ट्रातील आगमनही 15 दिवसांनी लांबलंय. गडचिरोलीमध्ये दुपारी अचानक ढगाळ वातावरण झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर सुरु आहे.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने आज मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.