बर्थडे स्पेशल : ‘थलैवा’ने जेव्हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता

मुंबई : आज थलैवा म्हणजेच आपल्या सुपरस्टार रजनीकांतचा वाढदिवस. रजनीकांत हे भलेही दक्षिणात्य सिनेसृष्टीतून असले तरी त्यांचे चाहते हे आपल्याला जगभर बघायला मिळतात. रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. म्हणूनच प्रत्येक सिनेमाआधी चाहते त्यांच्या फोटोची पूजा करतात. त्यांच्या सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षक आदल्या रात्रीपासून चित्रपटगृहाबाहेर रांगा लावतात. पण रजनीकांत यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, […]

बर्थडे स्पेशल : 'थलैवा'ने जेव्हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : आज थलैवा म्हणजेच आपल्या सुपरस्टार रजनीकांतचा वाढदिवस. रजनीकांत हे भलेही दक्षिणात्य सिनेसृष्टीतून असले तरी त्यांचे चाहते हे आपल्याला जगभर बघायला मिळतात. रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. म्हणूनच प्रत्येक सिनेमाआधी चाहते त्यांच्या फोटोची पूजा करतात. त्यांच्या सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षक आदल्या रात्रीपासून चित्रपटगृहाबाहेर रांगा लावतात. पण रजनीकांत यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, जेव्हा ते या सिनेसृष्टीच्या ग्लॅमरने त्रस्त झाले होते आणि त्यांनी सिनेक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता.

रजनीकांत यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘2.0’ लोकांनी उचलून धरला. या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ‘2.0’ हा सिनेमा 28 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. अवघ्या दहा दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील असंख्य रेकॉर्ड मोडित काढले. रजनीकांतच्या ‘2.0’ ने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर या सिनेमाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली होती.

अशा या थलैवाच्या आयुष्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी…

* रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 ला बंगळुरूत झाला. त्यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड. ‘रजनीकांत’ हे त्यांचं सिनेसृष्टीतील नाव. आईच्या निधनानंतर चार भावंडांतल्या सर्वात लहान रजनीकांतला पैसे कमावण्यासाठी हमालाचे काम करावे लागले. मोठं झाल्यावर त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली.

* बस कंडक्टर असले तरी रजनीकांतचा कल हा सिनेमाकडे होता. त्यांना अभिनयाची खूप आवड होती. 1973 साली त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा केला. त्यानंतर एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान रजनीकांतची भेट दिग्दर्शक के. बालाचंद्र यांच्याशी झाली. त्यांनी रजनीकांतला तामिळ सिनेमाची ऑफर दिली आणि रनजीकांतची रुपेरी पडद्यावर एंट्री झाली.

* 1975 साली या ‘अपूर्वा रागंगाल’ सिनेमातून रजनीकांतने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. या सिनेमात कमल हसन हे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात रजनीकांतच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली, त्यावर्षी या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

* सुरुवातीला रजनीकांतने खलनायकाच्या भूमिका केल्या. काहीकाळाने त्यांनी सकारात्मक भूमिका रंगवण्यास सुरुवात केली. 80 च्या दशकात रजनीकांतनी ‘अंधा कानून’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

* रजनीकांत यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, जेव्हा ते या सिनेसृष्टीच्या ग्लॅमरने त्रस्त झाले होते. त्यांनी सिनेक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचे जवळचे मित्र के. बालचंदर, कमल हसन यांनी रजनीकांतला हे करु दिले नाही.

* रजनीकांतचे ‘शिवाजी’, ‘रोबोट’, ‘कबाली’ हे सिनेमे सुपरडुपर हिट झाले. रजनीकांतने तामिळ सिनेमांसह हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले. सिनेसृष्टीतील त्यांच्या या अभूतपूर्व योगदानासाठी 2000 साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.