बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला विवस्त्र करुन मारहाण

बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला विवस्त्र करुन पेट्रोल टाकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Rape victim beaten) आहे.

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला विवस्त्र करुन मारहाण

अहमदनगर : बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला विवस्त्र करुन पेट्रोल टाकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Rape victim beaten) आहे. अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या महिलेसह तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पती-पत्नीकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी आरोपींनी दिली होती.

यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिलेला आरोपी सतत धमक्या देत होते. त्यानंतर या आरोपींनी पीडित महिलेला विवस्त्र करुन पेट्रोल टाकून मारहाण केली. यात पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पती-पत्नीने (Rape victim beaten) केला आहे.


Published On - 8:30 pm, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI