औरंगाबादेत रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांची मुजोरी, तक्रार करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण, महिलांनाही धक्काबुक्की

लॉकडाऊन असल्यामुळे लोकांच्या नावाने जितकं रेशन येतं तितकं रेशन त्यांना द्या, जेणेकरुन लोकांचं जगणं सोपं होईल, अशी मागणी शिक्षकाने केली होती (Aurangabad Ration shopkeeper beat Teacher).

औरंगाबादेत रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांची मुजोरी, तक्रार करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण, महिलांनाही धक्काबुक्की

औरंगाबाद : रेशन दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार (Aurangabad Ration shopkeeper beat Teacher) केल्यामुळे रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील मांडकी गावात घडली. या घटनेप्रकरणी शिक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून अद्यापही या घटनेची दखल घेण्यात आलेली नाही (Aurangabad Ration shopkeeper beat Teacher).

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान गरीब आणि होतकरु जनतेसाठी सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मांडकी गावातील रेशन दुकानदार शांतीलाल थोरात याच्याकडून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. रेशन दुकानदाराकडून पुरेशा प्रमाणात रेशन दिलं जात नव्हतं, ते पुरेशा प्रमाणात दिलं जावं, अशी मागणी शिक्षकाने केली होती. याप्रकरणी शिक्षकाने तक्रारदेखील केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

शिक्षकाने केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन या रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांनी शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांकडून शिक्षकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. शिक्षकाला बेदम मारहाण केली गेली. यावेळी महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी शिक्षकाने पोलिसात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून अद्यापही घटनेची दखल घेतली गेली नाही.

शिक्षकाने रेशन दुकानदाराविरोधात तक्रार केली होती. मात्र, त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. लॉकडाऊन असल्यामुळे लोकांच्या नावाने जितकं रेशन येतं तितकं रेशन त्यांना द्या, जेणेकरुन लोकांचं जगणं सोपं होईल, असं शिक्षकाचं मत होतं. शिक्षकाने केलेल्या तक्रारीवर कारवाई झालीच नाही उलट त्यांच्या घरावरच हल्ला करण्यात आला.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI