महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ : निलेश राणे

"महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ आहे" (Thackeray Government Portfolio Announced), असं म्हणत माजी खासदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर प्रहार केला आहे

महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ : निलेश राणे

रत्नागिरी : “महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ आहे” (Thackeray Government Portfolio Announced), असं म्हणत माजी खासदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर प्रहार केला आहे (Nilesh Rane on Portfolio Announced). महाविकास आघाडीच्या खातेवाटपाचा खरपूस समाचार यावेळी निलेश राणेंनी घेतला. इथून तिथून उचललं आणि स्वस्त कॅबिनेट दिलं गेलं.

“या खातेवाटपात सोईचं राजकारण जिथं जमलं त्या माणसाला मंत्री केलं. त्यामुळे या कॅबिनेटकडून फार अपेक्षा नाही, असा टोला निलेश राणेंनी महाविकास आघाडीला लगावला. सरकारमधला प्रत्येक पक्ष भुकेलेला, भूक जास्त लागली म्हणून या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं”, असा टोला निलेश राणेंनी लगावला.

इतकंच नाही तर मंत्री आदित्य ठाकरेंना पर्यावरण मंत्रालय देणावरुन निलेश राणेंनी त्यांची खिल्ली उडवली. “ज्याने कधी ग्रामपंचायत लढवली नाही, तो पर्यावरण खातं काय संभाळणार”, असं म्हणत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. “जंगलात राहिल्यामुळे आदित्य ठाकरेंना फक्त डास आणि फुलपाखरांची सवय आहे, म्हणून बहुदा त्यांना उद्धव ठाकरेंनी पर्यावरण खातं दिलं असावं”, अशी खोचक टीका निलेश राणेंनी केली.

कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या उदय सामंतावरही निलेश राणेंनी टीकास्त्र सोडलं. “मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंना करोडो रुपये दिल्याने सामंताना मंत्रिपद मिळाल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. त्यामुळे दिलेले पैसे मिळालेल्या मंत्रिपदातून वसूल कसे करायचे, याचाच विचार उदय सामंत करत असणार”, अशी टीकाही निलेश राणेंनी सामंतांवर केली.