वनविभागाचे 150 कर्मचारी, 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाळत, 8 बळी घेणारा RT1 वाघ जेरबंद

राजुरा उपविभागात आठ ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या RT1 वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. वनविभागाच्यावतीने गेले आठ महिने वाघाचे शोध अभियान सुरू होते. (RT1  tiger successfully caught by Rajura Forest Dept. in Chandrapur)

वनविभागाचे 150 कर्मचारी, 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाळत, 8 बळी घेणारा RT1 वाघ जेरबंद
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 8:04 PM

चंद्रपूर: राजुरा उपविभागात आठ ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या RT1 वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. वनविभागाच्यावतीने गेले आठ महिने वाघाचे शोध अभियान सुरू होते. RT1 वाघ विरूर येथे एका रेल्वे पुलाच्या खाली तयार केलेल्या कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यामध्ये अडकला. वाघ अडकल्याचे कळताच बेशुद्ध करणाऱ्या पथकाने धाव घेत त्याला बेशुद्ध करत पिंजरा बंद केला. या पिंजऱ्यात वाघाचे भक्ष्य ठेवण्यात आले होते. वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आल्याने वनविभागाच आठ महिन्यांचे श्रम कामी आले आहे. यामुळे वनविभाग आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (RT1  tiger successfully caught by Rajura Forest Dept. in Chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागात धुमाकूळ घालणाऱ्या RT1 वाघाने गेले वर्षभर या उपविभागात वन व्याप्त क्षेत्रातील गावांमध्ये या वाघाने एकूण 8 ग्रामस्थांना ठार केले होते. या वाघाच्या बंदोबस्तासाठी मोठी यंत्रणा कामी लागली होती. आज दुपारी मध्य रेल्वेच्या विरुर ते सिंधी या स्थानकांदरम्यान असलेल्या एका छोट्या पुलाखाली वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम सापळ्यात तो अडकला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या वन व्याप्त गावांमध्ये RT1 या वाघाची दहशत पसरली होती. वनविभागाची विविध पथके व एकूण 150 कर्मचारी या भागात अभियान राबवित होते. राजुरा विभागातील सुमारे 100 कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने RT1 वाघावर नजर ठेवली जात होती. अखेर या पाळतीला यश मिळाले. वाघ कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात अडकल्याचे कळताच वाघाला बेशुद्ध करणारे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पूर्ण सावधगिरी बाळगत या वाघाला पथकाने बेशुद्ध केले. यानंतर काही काळ वाट पाहून अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत वाघाला तातडीने ट्रॅक्टर वरील पिंजऱ्यात हलवण्यात आले. त्याआधी या वाघाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात तो पूर्णपणे तंदुरुस्त आढळला आहे.

वनविभागाने RT1 वाघाला सध्या अज्ञातस्थळी नेले असून तो आणखी काही काळ निरीक्षणाखाली राहणार आहे. गेले वर्षभर शेतीकामे असो अथवा जंगलातील गौण वनोपज आणण्यासाठी ग्रामस्थांची धडपड या सर्वच सरावाच्या गोष्टी वाघाच्या दहशतीमुळे त्रासदायक ठरल्या होत्या. वनविभागावर RT1 वाघाला गोळ्या घालण्यासाठी दबाव वाढत होता. मात्र, वनविभागाने संयमाने परिस्थिती हाताळत RT1 वाघाला जेरबंद केल्याने परिसरातील हजारो नागरिक आणि वनविभाग कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे.

राजुराचे विभागीय वनाधिकारी अरविंद मंडे यांनी RT1 वाघाला ट्रॅप करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली असल्याचे सांगितले. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर वैद्यकिय पथकाला बोलावले, त्यांनी महत्वाची कामगिरी केली. राजुरा आणि विरुर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती.

RT1 वाघ लवकरात शुद्धीवर येण्याची शक्यता होती. त्यापूर्वीचं प्राथमिक उपचार करुन वाघाला ट्रॅक्टरमधील पिंजऱ्यात हलवले, असं पशु चिकित्सक डॉ. कुंदन गोडशेलवार यांनी सांगितले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात राखीव वनक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या वर्षभरात वाढ झाली असून वाघ मृत्यूच्या संख्येतही चिंताजनक वृद्धी दिसून येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वंकष उपाय योजना करून त्याचा केंद्रबिंदू शेतकरी असणे गरजेचे असल्याचे आता बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

‘मोगली’नंतर खराखुरा ‘बगिरा’ चंद्रपूरच्या ताडोबात दिसला!

Chandrapur Tiger Attack | राजुरात वाघाचा धुमाकूळ, 7 ग्रामस्थांचा बळी

(RT1  tiger successfully caught by Rajura Forest Dept. in Chandrapur)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.