परळीतील गावात लाव्हारस बाहेर येत असल्याचा दावा, काय आहे सत्य?

परळीतील गावात लाव्हारस बाहेर येत असल्याचा दावा, काय आहे सत्य?

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील परळीमधील सिरसाळा गावात लाव्हारस बाहेर निघत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा प्रकार पाहण्यासाठी लोक गर्दीही करत आहेत. टीव्ही 9 मराठीनेही या प्रकाराची पडताळणी केली आणि हा खरंच लाव्हारस आहे का याबाबत जाणून घेतलं. शिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करताना लोकांना भीती वाटेल असा मजकूर लिहिला जातोय. त्यामुळे टीव्ही 9 मराठीने नागरिकांची भीती दूर करण्याचाही प्रयत्न केलाय.

या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. भूगर्भातील लाव्हा पाहण्यासाठी जिल्ह्यातील लोकांची गर्दी या ठिकाणी होत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात होती. मात्र सदर बाब ही रिवर्स करंटमुळे झाली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकलाय.

व्हिडीओत दाखवला जाणारा हा प्रकार लाव्हा नसून तिथेच बाजूला असलेल्या 10 केव्हीच्या खांबामध्ये करंट उतरल्याने, तो करंट खडकाळ जमिनीत जाऊन रिटर्न करंट तयार झाला. त्यातून तयार झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे हा लाव्हारस सदृश पदार्थ तयार होऊन बाहेर पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून परिसरातील नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI